सावदा पो.स्टे.हद्दीत सपोनि वाघांच्या दराराने नागरिकांची संचारबंदी
सपोनि राहुल वाघ यांचा कार्यशैलीचा परीसरात दबदबा
मुख्य चौक, रस्ते,वस्या,वाडे,गावे निर्मनुष्य
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर.जि.जळगांव
सध्या संपूर्ण जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना व्हायरस ला प्रतिबंध करण्यासाठी देश कसोशीने प्रयत्न करत आहे सतत केंद्र सरकार राज्य सरकार ने लॉक आऊट कलम १४४ जमावबंदी कायद्यान्वये ५ लोकांना एकत्र जमण्याची मनाई आदेश दिले मात्र काही नागरिक आदेशांचे उल्लंघन करून कायद्याचा अपमान करीत आहेत व विनाकारण घराबाहेर निघुन चौकांत,व रस्त्यावर गर्दी करीत असल्याचे चित्र सोशल मीडिया अथवा माध्यमातून पाहवयास मिळत आहे. मात्र सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या उत्कृष्ट कार्यशैली *पहले मुलाकात फिर बात और जरूरत पडे तो लाथ* या कार्यपध्दतीमुळे सावदा पोलिस स्टेशन हद्दीत चांगलाच दरारा असल्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात जमावबंदी कायद्याचे व संचारबंदी चे तंतोतंत पालन केले जात आहेत .
अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा वगळता घराबाहेर चिलपाखरू ही दिसत नसल्याने शासनाने केलेल्या लॉक आऊट चे तंतोतंत पालन सावदा पो.स्टे.चे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे आज दि.२७ रोजी मोठा वाघोदा येथे आजही गावात स्मशान शांतता पसरली होती रस्ते निर्मनुष्य दिसत होते म्हणून च सुज्ञ नागरिकांच्या तोंडून सावदा पोलिस ठाण्याचे वाघ यांचे दरारानेच ही संचारबंदी असल्याचे बोलले जात आहे तसेच त्यांचे कार्याचेही मोठा वाघोदा वासियांतर्फे कौतुक केले जात आहे






