sawada

सावदा नगरपालिका पाणी पुरवठा निरीक्षक पांडुरंग पाटील सेवानिवृत्त

सावदा नगरपालिका पाणी पुरवठा निरीक्षक पांडुरंग पाटील सेवानिवृत्त

युसुफ शाह सावदा. ता :- रावेर

Sawda : सावदा नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा तत्कालीन मुख्याधिकारी बागुल यांनी सुरवातीला पांडुरंग पाटील यांची ओळख करून दिली. आणि सांगितले की, हे येथील पाणी पुरवठा निरीक्षक आहे मात्र यांचा आवाज फार मोठा आहे. परंतु ते मवाळही तितकेच आहेत. मागील आठवणींना उजाळा देत मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले की,आज सावदा शहर नगरपालिकेचे पाणी पुरवठा निरीक्षक सावदा येथील रहिवासी , पांडुरंग पाटील हे प्रदीर्घ सेवेनंतरही त्यांच्या अनुभवाचा लाभ इथून पुढेही नगरपालिकेला मिळत राहील, असे मत मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी व्यक्त केले. त्यांच्या कर्तव्यपूर्ती सोहळा समारंभ प्रसंगी मुख्याधिकारी सौरभ जोशी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व माजी सेवा निवृत्त कर्मचारी माजी भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, प्रभाकर पाटील, अरूण बढे, अरूण पाटील, विलास इंगळे, पाणी पुरवठा अभियंता जितेश पाटील, नगररचनाकार ऐश्वर्या पिंगळे, स्थापत्य अभियंता अविनाश गवळे, कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके, लेखापरीक्षक भारती पाटील, करनिरीक्षर अनिलकुमार आहुजा. नगरसेवक राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी म्युनिसिपल स्टाँफ को. सोसायटी कडून त्यांना भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यात येऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन, हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ,पांडुरंग पाटील यांच्या आई, पत्नी, न. पा. चे किरण चौधरी, कनिष्ठ अभियंता धनराज राणे, लेखापाल वसंत महाजन, विमलेश जैन, महेश चौधरी, अविनाश पाटील, धनराज पाटील, बबन तडवी, प्रमोद राणे, सतिष पाटील. आदि कर्मचारी उपस्थित होते. चेअरमन, अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक किरण चौधरी यांनी केले. सोशल डिस्टन्स व शासन नियमानुसार सोहळा संपन्न झाला. त्यानंतर पाटील यांना वाजतगाजत त्यांच्या निवासी क्रांती चौक येथे पोहचते केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button