Sawada: वर्दीतील माणूस सपोनि विशाल पाटील:आदिवासी बांधव सोबत साजरी केली दिवाळी!
सावदा ता.रावर प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- इतरांसारखी आनंद उत्साहात दुर्गम भागातील रहिवासी गोरगरिबांच्या मुलांनी देखील दिवाळी साजरी केली पाहिजे असा चांगला व कौतुकास्पद विचार मनात ठेवून आज दि.१ ऑक्टोबर २०२४ रोजी थेट सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पाल परिसरात व सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहमांडली या गावात रहिवासी गोरगरीब आदिवासी बांधव आणि त्यांच्या मुलांना मिठाई,फराळ व फटाके वाटप करुन,आदिवासी बांधव सोबत सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी इतरांनी या पासून बोध घ्यावा अशी आनंदाची दिवाळी साजरी करुन,वर्दीतील माणूसकीचा परिचय दिला.या पोलीस ठाण्यास अनेक पोलीस अधिकारी लाभले परंतू अशा प्रकारे गोरगरीब आदिवासी बांधव सोबत दिवाळी साजरी करणारे पहिले मानकरी सदरीचे पोलिस अधिकारी दिसून आले.याप्रसंगी उपनि राहुल सानप,बिट हवालदार निलेश बाविस्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.






