कामतवाडीत युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या सहभागातून सावित्रीमाईंचा जन्मोत्सव साजरा..
राजनिकांत पाटील अमळनेर
अमळनेर : 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कामतवाडी ता. अमळनेर येथे जळगाव काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड संदीप भैय्या पाटील, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेशदादा पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुलोचनाताई वाघ,किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृषिभुषण सुरेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष नगरसेवक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “महिला शिक्षण दिन ” उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सावित्रीमाईंच्या प्रतिमेला सरपंच नागेनबाई पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रंथपाल ज्योतीबाई पाटील, अलकाबाई पाटील, सुनिता पाटील, आशाबाई पाटील, मालुबाई पाटील , मंगलबाई पाटील, लक्ष्मी पाटील आदी महिला ग्रामस्थांकडून प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर गावात दर्शना पवार (कार्यवाह, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक अमळनेर) यांनी लिहिलेल्या सावित्रीमाईंच्या जन्मोत्सव पुस्तकाचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, सरचिटणीस मयुरेश पाटील, डिगंबर पाटील , महेंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, संजय पाटील, गोपाल पाटील, गणेश पाटील,भागवत पाटील आदी मान्यवरांनी प्रयत्न केले.






