आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशिल असावेत- सपोनि श्री देविदास इंगोले तडवी त्रिमूर्ती फाऊंडेशनतर्फे सपोनि श्री इंगोले यांचा सत्कार
प्रतिनिधी : मुबारक तडवी सावदा
सावदा : आदिवासी तडवी भिल समाज मेहनती जिद्दी,कष्टाळू दुर्गम भागात रहिवास करुन अहोरात्र काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणारा समाज आहे मेळघाटातील आदिवासी समाजाचे जीवनमान , राहणीमान मी स्वता बघितलेले आदिवासी समाज निरक्षरतेतून साक्षरतेकडे वळण्याची आज नितांत गरज आहे आदिवासी समाजातील होतकरू हुशार विद्यार्थ्यांना नवयुवकांना शिक्षणाची कास लावण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचं ते सत्कार प्रसंगी म्हणाले
सावदा पोलिस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री डी.डी.इंगोले साहेब यांना दिपावली च्या शुभेच्छा तसेच सावदा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारले बाबत तडवी त्रिमूर्ती फाऊंडेशन ग्रुप टीम तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ ( बुके ) देवून सत्कार करतांना मोठा वाघोदा दैनिक पुण्यनगरी पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य मुबारक उर्फ राजू अलिखां तडवी , आदिवासी ग्रुप त्रिमूर्ती फाऊंडेशन टीम चे कार्यकर्ते असलम सलिम तडवी , संजीव रमजान तडवी , लोहारा , बबलू तडवी जळगांव पिएसआय श्री.राजेंद्र पवार साहेब,पो कॉ.युसूफ तडवी,पो.कॉ. शे.रिजवान पिंजारी,पो कॉ मेहरबान तडवी आदी उपस्थित होते






