माजलेल्या वनरक्षकास तात्काळ निलंबित करण्यात करा-संजय वाघमोडे
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: राधानगरी तालुक्यातील आसनगाव धनगरवाड्यावरील श्री. लखू धोंडीराम पटकारे जेष्ठ नागरिक वय ६५ व त्यांचे नातू राजू मांगु पटकारे (वय-१४) यांना वन कर्मचारी श्री. भैरु यादव यांनी काठीने बेदमपणे मारहाण केली.श्री. पटकारे यांची अभयारण्य क्षेत्रात चुकलेली जनावरे ते शोधण्यासाठी गेले असता, त्यांच्या हातातील काठी घेऊन बेदमपणे मारहाण केली.
कोविड 19 च्या लाॅकडाऊन मुळे धनगर समाजावर उपासमारीची वेळ आली आहे .जवळजवळ सर्वच धनगर समाज हा भूमिहीन आहे .त्यामुळे दररोज शेळया-मेढंया जनावरांना चारायला जंगलात जाणे, वाळलेली झाडाच्या लहान फांद्या गोळा करून विकणे,जांभळे,करवंद, इत्यादी गोळा करून विकणे रोजंदारी, यावरच आपल्या उपजिवीकेचा प्रश्न सोडवतात. परंतू या लाॅकडाऊन मुळे या जंगलमय भागातील लोकांना अनेक अडचणी येत आहेत मुख्य गावापासून दहा बारा किलोमीटर जंगलात राहत असलेल्या मुळे जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी मुख्य गावात ,रेशन बाजारहाट आणण्यासाठी यावे लागते जंगलातून वनरक्षक व गावात पोलीस येऊ देत नाहीत.तेल तिखट, अशा जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने अक्षरशः उपाशीपोटी दिवस काढत आहेत.अशी परिस्थिती आहे.
आसणगाव धनगरवाडा येथे चुकलेल्या जनावर शोधण्यासाठी गेलेल्यांना मदत देण्याऐवजी त्यांच्या नातवास व त्यांना वनरक्षकाने अमानुष मारहाण केली आहे. याचा यशवंत सेनेच्या वतीने तीव्र निषेध करणेत येत आहे.
ज्या राधानगरी जंगलात रा. छ.शाहु महाराजानी धनगर समाजाला वनक्षेत्र उपल्बध करून दिले. त्रास देणाऱ्या वाघीणीला ठार केले.त्याच राधानगरी जंगलात आज माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.आजची अशी हि परिस्थिती आहे. याच जंगलात सहा महिन्यापुर्वी गव्याच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या विठ्ठल बाजारीलाही माजलेल्या वनकर्मचाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याऐवजी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.
लाॅकडाऊन मुळे धनगर समाजावर उपासमारीची वेळ आली आहे .तरी याची दखल जिल्हाधिकारी साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी घेऊन धनगर समाजाला मदत करायला हवी व अशी मागणी यशवंत सेनेच्या वतीने संजय वाघमोडे यांनी केली आहे. . धनगर समाजाचे काठी न घोंगड हेच अस्त्र आहे. त्यांचेच अस्त्र त्यांच्याकडून घेऊन त्यांना याप्रकारे मारहाण करून.अशा या वनरक्षकाने छ.शाहू महाराजांच्या पवित्र अशा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे वृद्ध व लहान मुलास मारहाण करून काळीमा फासला आहे.
बेकायदा प्रवेश केला.म्हणून जंगलातच त्यांच्याच काठीने मारहाण करणे.. ? मुळात हा अधिकार या कर्मचाऱ्यांना कोणी दिला ?
शासकीय कामात अडथळा म्हणुन खोटा गुन्हा दाखल करुन बचाव करण्यासाठी प्रयत्न करतात.!
त्यामुळे वेळीच वरिष्ठ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करुन त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले पाहिजे.
कार्यवाही करण्यात आली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा ही यशवंत सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.






