Khopoli

नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा वसा जपणार्‍या “महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांचा” वर्धापन दिनाचा शाही सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न

नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा वसा जपणार्‍या “महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांचा” वर्धापन दिनाचा शाही सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न

विजय कानडे खोपोली

महाराष्ट्रातील नामांकित पुरोगामी पत्रकार संघाचा सोहळा नुकताच खोपोली येथे उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवीत कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन पुरोगामी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माननीय राजे श्रीमंत महाराज रोहित राजे पवार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिका वाचून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे महाराष्ट्र राज्य सहसचिव मा. श्री सागर ननावरे यांनी केले. प्रसिद्ध निवेदिका प्राची भगत व राजेश रसाळ यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरगाणा संस्थांनाचे वंशज
मा.राजे श्रीमंत महाराज रोहित राजे पवार देशमुख लाभले.
रोहितराजे यांनी आपल्या भाषणात संघाचे भरभरून कौतुक केले. “संघाचे अध्यक्ष “विजय सुर्यवंशी ” यांच्या सारखे जबाबदार नेतृत्व असलेकी, संघ स्वःबळावर विकासाची क्षमता बाळगतात. आणि म्हणुनच लोकोपयोगी कामे घडून येतात. हे काम करीत असताना ते काम पुर्णत्वाला नेवून त्याचे श्रेय स्वतः न घेता समाजाला देवून त्याचेच अभिनंदन करणा-या संघाचे काम व कार्य कौतुकास्पद ठरत आहे. तसेच तरूणांनी दिशाहीन न होता,योग्य दिशा ठरवून अध्यात्मिकाची जोङ धरून आपली वाटचाल करावी,असे मा.राजे श्रीमंत महाराज रोहित राजे पवार देशमुख यांनी सांगितले.

यावेळी विविध मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करताना, संघाचे आभार व पुरस्काराने आम्हाला प्रेरणा मिळाली, संघांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी विजय सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष,
डॉन केके कार्याध्यक्ष,बाळासाहेब आडागळे सल्लागार,प्रवीण परमार राज्य सचिव विनोद पवार,कोर कमिटी अध्यक्ष प्रवीण दोशी,उपाध्यक्ष
प्रकाश चितळकर,उपाध्यक्ष
सुनिता तोमर महिला अध्यक्ष महाराष्ट्र,सुनील चौधरी कायदेशीर सल्लागार ऑड दत्तात्रय भोसले
कोषाध्यक्ष,अमरसिंह राजपूत प्रसिद्धीप्रमुख,सागर ननावरे सहसचिवमहाराष्ट्र राज्य आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री.
नंदकिशोर भोईर,सतीश पेडणेकर, राजेंद्र वारंगे,प्रदीप वायदंडे,सतीश पेडणेकर, नितीन जाधव, प्रशांत भोईर, विजय म्हात्रे,एस आर पाटील, अरुण चवरकर, प्रल्हाद पाटील कंचन दौंड रिषभ तोमर फिरोज खान ज्ञानेश्वर बागुल असिफ अली प्राध्यापक किरण चव्हाण प्राध्यापक पवार सर युवराज सिंग राजपूत सुभाष जैन विजय कानडे अमोल भालेराव यांनी केले होते.
यांच्यासह संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.तर आभार प्रदर्शन राजेंद्र यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button