फैजपूर शहरात बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे रूट मार्च
सलीम पिंजारी
फैजपूर येथील पोलीस स्टेशन तर्फे बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर रुड मार्च काढण्यात आला फैजपूर शहरातील प्रमुख रस्त्या या मार्गावरून रूड मार्च काढण्यात आला.रुट मार्च ची सुरुवात फैजपुर पोलीस स्टेशन पासून जुने हायस्कूल खंडेराव वाडी रोड रथ गल्ली लक्कड पेठ कुरेशी मोहल्ला खुशाल भाऊ रोड तसेच बसस्थानक पासून मुनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक येथे रुड मार्च काढण्यात आला. बकरी ईद या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यानिमित्त पोलिसांतर्फे प्रत्येक सणाच्या वेळी रूट मार्श काढण्यात येतो. यावेळी कोरोना संसर्ग च्या प्रादुर्भावाला आळा बसावा म्हणून पोलीस सुद्धा परिश्रम घेत आहे.
बकरी ईद निमित्त रूट मार्च काढण्यात आला असून कायदा आणि सूव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे. फैजपूर विभागाचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखडे, पीएसआय ठोंबरे पोलीस कर्मचारी यशवंत टहाक, डे राजेश बराटे, मोहन लोखंडे, वाहतूक पोलीस बाळू भोई ,उमेश पाटील, अनिल महाजन ,दिनेश भाई तसेच होमगार्ड सर्व पोलिस कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.






