Maharashtra

विलासराव पाटील यांची काँग्रेस पक्षातर्फे विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करा

विलासराव पाटील यांची काँग्रेस पक्षातर्फे विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करा काग्रेंसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक सेलची मागणी

प्रतिनिधी नूरखान

विलासराव पाटील, यांची काँग्रेस पक्षातर्फे विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करा अशी मागणी उत्तर महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे.

विलासराव शांताराम पाटील, धुळे हे काँग्रेस पक्षात १९८९ पासून कार्यरत आहेत.त्यांनी सुरुवातीला एन .एस.यु.एल या विद्यार्थी संघटनेत अमळनेर तालुका उपाध्यक्ष या पदापासून पक्षकार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस ओ.बी.सी सेलचे खान्देश विभाग संघटक,धुळे महानगर कार्यकारिणी सदस्य, काँग्रेस शिक्षक सेलचे नाशिक विभाग सचिव म्हणून कार्य केलेले आहे.
विलासराव पाटील जसे पक्षाचे कार्य निष्ठेने करतात. तसेच कार्य ते शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करतात. ते स्वतः धुळे येथे शिक्षक आहेत. देवगाव -देवळी,ता.अमळनेर, येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल व सावित्रीबाई फुले वाचनालय सुरु केलेले आहे.ते धुळे जिल्हा माध्य व उच्च माध्य.सह.पतसंस्थेत १० वर्षांपासून संचालक आहे.सदयस्थितीत व्हाईस चेअरमन आहेत.त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी शिक्षक संघटनेकडून यशस्वी प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी २००६,२०१२,२०१८ मध्ये विधानपरिषदेची नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढविली आहे.
अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने त्यांनी माळी समाजाचे मोठे संघटन उभे केले आहे. ते याचे संस्थापक विश्वस्त असून राष्ट्रीय कार्याध्यक्ष व प्रवक्ता आहेत. यापूर्वी त्यांनी माळी कर्मचारी सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सोळा वर्ष काम केले आहे. त्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे संघटन केलेले आहे.त्यांनी माळी समाजाचे मेळावे, कार्यकर्ता शिबीर घेतलेली आहेत. तसेच ओबीसी बांधवांसाठी खूप मोठे काम केले आहे. त्यात प्रामुख्याने क्रिमीलेअरची मर्यादा वाढविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणे,ओ.बी.सी महामंडळाला निधी वाढवून मिळणे यासाठी पाठपुरावा, ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देणे,विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवून देणे, याकामी यशस्वी पुढाकार घेतला आहे.त्यांनी पुणे व नाशिक येथे आयोजित ओ.बी.सी सहित्य संमेलनात सक्रीय सहभाग घेतला आहे.
विलासराव पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक व पक्षाचे कार्य त्यांची काँग्रेस पक्षांतर्फ विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस व्हावी ही विनंती.विलासराव पाटील विधानपरिषदेत शैक्षणिक व सामाजिक प्रश्न आक्रमकपणे मांडतील.यासाठी उत्तम महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक सेलने त्यांची विधानपरिषद सदस्य पदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button