रावेर तालुका येथे 100% जनता कर्फ्यु यशस्वी,.,
रावेर तालुका प्रतिनिधी# विलास ताठे
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव व आरोग्य आणीबाणी ला थांविण्यासाठी तसेच आपलं,परिवाराच आणि देशाचं हीत जोपासण्यासाठी प्रशासन प्रणाली 100% यशस्वीपणे राबवून घेत, स्वतःच्या जबाबदारी ने संवेदनशीलता दाखवून प्रत्यक्ष 24 तास बारीक लक्ष ठेवून, सतत कार्यरत राहणारे खरे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री डॉ, अजित थोरबोले साहेब यांनी रावेर शहरात स्वतः आपल्या शासकीय वाहनातून कोरोना विषयक समुपदेशन करतांना दिसत असून जनता कर्फ्यु साठी जनतेला अपील करतांना दिसून आले.
तसेच
वैद्यकीय सेवेतील सर्व डॉक्टर, नर्स,हाॅस्पीटलचा पूर्ण स्टाफ,आरोग्य सेवक, सेवा पुरविणारे दवाखाने, मेडिकल स्टोअर्सचे मालक, मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करणारे त्यांचे सहकारी, तसेच संपूर्ण शासन प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागात काम करणारे अधिकारी, पोलिस कर्मचारी बांधव आणि आपल्या जिवाच्या पलीकडे जाऊन अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या डॉ अजित थोरबोले प्रांतधिकारी फैजपूर या देशभक्त , समाजसेवक , उत्तम प्रशासक म्हणून रावेर यावल तालुक्यातला लाभले, व त्यांनी रावेर यावल तालुक्यात शंभर टक्के जनता कर्फ्यु यशस्वी केला,या संपूर्ण प्रकरणात रावेर यावल तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने ही स्वयंम पूर्ण जोरदार प्रतिसाद दिला, यामुळे संबंधित तालुक्यांत कोठे ही अफवा, किंवा तारांबळ उडाली नाही,






