Rawer

रावेर पोलिसांनी ५ हजार ची दारू केली जप्त

रावेर पोलिसांनी ५ हजार ची दारू केली जप्त

रावेर प्रतिनिधी / शकील शेख

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोना या रोगाचे प्रतिबंध संदर्भात जिल्ह्यात जमावबंदी व संचार बंदी लागू आहे.
या दरम्यान अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या 3 जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदी दरम्यान 3 जण अवैध रित्या दारूची वाहतूक करित होते.
त्यांच्या जवळ सुमारे 2 हजार 496 रुपये किमतीच्या संत्रा देशी दारूच्या 180 मिली च्या 48 बाटल्या तर 2 हजार 496 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा देशी दारूच्या 180 मिली च्या 48 बाटल्या व 15000/- रु किमतीची एक बजाज सी. टी. 100 लाल रंगाची मो. सायकल क्रमांक MH 19 AG 9455 असा ऐवज आरोपींकडून जप्त करण्यात आला.

आरोपी हे विना परवाना, बेकायदेशीररीत्या लॉकडाउन असतांना वाहतूक करीत असताना मिळून आल्याने पोलीसांनी 3 आरोपींना अटक केली आहे.
याबाबत रावेर पोलीसात फिर्यादी पो. कॉ. महेंद्र युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरून गु. र. नं. – 11/2020 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1955 चे कलम 65 (इ) प्रमाणे आरोपी अब्दुल सत्तार शे. गुलाब वय 57 वर्षे रा. गरीब नवाज मोहल्ला रावेर, शे. रफिक शे. कय्युम रा.गरीब नवाज मोहल्ला रावेर, रामचंद्र कडू तायडे रा. आसराबारी रावेर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास- पो. हे.कॉ. सतिष सानप करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button