सावदा येथे रॅपिटेशन फोर्सचा जबरदस्त रूट मार्च “सण उत्सवाच्या काळात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होता कामा नये. रूट मार्च द्वारे समाजकंटकांना इशारा-एपीआय देविदास इंगोले”
युसूफ शाह सावदा
सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आज दि.१३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २ ते २-३० वाजेच्या सुमारात चिनावल गावातील गणपती विसर्जन मार्ग तसेच दु.३ ते ३-४० वाजेच्या दरम्यान गणेशोत्सवाच्या अनुषंगाने थेट सावदा शहरातील संवेदनशील भागातून रॅपिड ऍक्शन फोर्स, आर. सि. पी. प्लाटून, सावदा पो.स्टे. चे कर्मचारी, होमगार्ड यांचा रूट मार्च मा. रॅपिड ऍक्शन फोर्स कंपनीचे शशिकांत राय डेपोटी कमांडंट यांचे उपस्थितीत घेण्यात आला.
सदर रूट मार्च सुरु होण्या आधी चिनावल गावाचे व सावदा शहराचे संवेदनशील भागाची , मिस्त्र वस्ती व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागाबाबत रूट मार्च चे महत्त्व समजावून सांगून सावदा बस स्टेशन पासून हा रूट मार्च सुरू करण्यात आला.
शहरात संवेदनशील असलेल्या शेखपुरा, चाँंदणी चौक,शनी मंदिर, ख्वाजा नगर, जमादार वाडा, संभाजी चौक, गांधी चौक गवत बाजार, बडा आखाडा, शिवाजी चौक, मोठा आड, इंदीरा गांधी चौक, महाविर चौक मार्गे पुन्हा बस स्टेशन येथे रूट मार्च संपविला आहे.
सदर रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सचे १ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस अधिकारी, असे एकूण ८१ कर्मचारी सह सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष एपीआय देविदास इंगोले, उप निरक्षक राजेंद्र पवार, उपनिरीक्षक समाधान गायकवाड सहीत १८ पोलीस अंमलदार, आर.सि.पी. प्लाटून व ३० होमगार्ड या रूट मार्च मध्ये उपस्थित होते.
सदरचा रूट मार्च घेण्यामागील उद्देश गणेश उत्सव शांततेत पार पाळला जावा. सदर काळात कोणत्याही प्रकारची गडबड करण्याचे धाडस समाजकंटका कडून होता कामा नये निवड हा संदेश देण्यासाठी असते.हे मात्र खरे आहे. याप्रसंगी शहरातील सर्व नागरिकांना एपीआय देविदास इंगोले यांच्याकडून गणेश उत्सवाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.






