घरोघरी तिरंगा अभियान जनजागृतीसाठी दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलची रॅली संपन्न
दिंडोरी- सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण भारतभर अमृत महोत्सव निमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान राबविले जाणार असून या अभियानाची जनजागृती करण्यासाठी दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दिंडोरी स्कुल पासून दिंडोरी शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे उदघाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज व प्राचार्य रमेश वडजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रास्तविक प्राचार्य रमेश वडजे यांनी केले त्यानी प्रस्तविकात भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, व हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहभागी व्हावे असे आव्हाहन केले.
गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी बोलतांना सांगितले की १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय/निमशासकीय / खाजगी अस्थापना/सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे.यासाठी दिंडोरी तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालये सक्रिय सहभागी झाले असून या निमित्ताने विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी रॅलीमध्ये विद्यार्थी तिरंगी ध्वज, जनजागृतीचे फलक, हातात घेऊन ढोल ताश्यांच्या गजरात घोषणा देत सहभागी झाले होते.यावेळी प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे, पर्यवेक्षक डॉ जी व्ही आंभोरे, आर व्ही मोकळ, श्रीम एन पी चौधरी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीचे नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष सौ मेघा धिंदळे, मुख्याधिकारी नागेश येवले व नगरसेवक, अधिकारी ,नागरिक यांनी स्वागत केले व रॅलीत सहभागी झाले होते.
शालेय परिसराची स्वछता-
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शालेय,वर्ग, परिसर व मैदानाची स्वच्छता केली.
फोटो- घरोघरी तिरंगा अभियान जनजागृतीसाठी दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलची रॅली प्रसंगी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, प्राचार्य रमेश वडजे आदी






