क्वारंटाईन व्हा..म्हणणे ग्रामीण भागात ठरतेय भांडणाचे मूळ
आमचे नावे का कळविले,म्हणून गावोगावी होत आहेत वाद…
नांदेड जिल्हा प्रतिनिधी : वैभव घाटे
ग्रामीण भागात बाहेरगावून वास्तव्यास आलेल्या व्यक्तीपासून कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गावपातळीवर त्यांना आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करून घेऊनच गावात किंवा त्यांच्या घरी इतरांपासून १४ दिवस विलग राहण्यासाठी प्रशासन आवाहन करत आहे.त्यासंबंधीची काळजी ग्राम सुरक्षा समितीने घ्यावयाची असताना मात्र बिलोली तालुक्यातील अनेक गावात याची कसल्याही प्रकारे पूर्तता करताना दिसून येत नाही.शिवाय संबंधिताची माहिती आरोग्य प्रशासनाला त्यांच्या शेजारीपाजार्यानी कळविल्याने मात्र ग्रामीण भागात भांडणाचं मुळ ठरत आहे.
परराज्यातून तसेच मुंबई,पुणे, औरंगाबाद,नाशिक आदीसह इतर बाधित जिल्ह्यातून त्यांच्या गावी परतण्यासाठी अडकलेल्या लोकांना शासनाकडून काही अटीवर परवानगी देण्यात आली.त्यानुसार तालुक्यातील अनेक गावात विद्यार्थी व कामगारांची घरवापसी झाली आहे.परंतु या घरवापसीने ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ग्रामीण पातळीवर सुरक्षा समितीची स्थापना करून संस्थात्मक विलगीकरण कक्षाची व्यवस्था त्यांच्या घरीच किंवा इतर ठिकाणी करून वास्तव्यास येणाऱ्या व्यक्तींना आदेश पारित केल्यापासून १४ दिवस क्वारंटाईन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र तालुक्यातील अनेक गावात बाहेरून आलेले अनेकजणांनी संबंधित आरोग्य प्रशासनाला याची कसलीच माहिती दिली नाही.अशा लोकांची माहिती त्यांचे शेजारी पाजारी कोरोनाच्या धास्तीने प्रशासनाला देण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु आमचे नाव का कळविले… आमच्या घरात बाहेरून कोणीही आलं नाही…अस म्हणत भांडणे होऊ लागल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात सध्या तरी भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
———————————–
अनेक गावात विलगीकरण कक्ष तर नाहीच परंतु त्यांची घरी आल्याने चक्क दुसऱ्या दिवशी तपासणी केली तर अनेकांनी थेट घरातच प्रवेश करून माहिती लपवण्याचा प्रयत्न करताहेत.
अशा व्यक्तींच्या घराशेजारील मंडळी मात्र याबाबत भीती व्यक्त करत आहेत.






