मराठी भाषा गौरव दिनानिमित्त धनाजी नाना महाविद्यालयात कार्यक्रम
माणूस जिवंत असेपर्यंत मराठी भाषेची काळजी करण्याचे कारण नाही- डॉ. मनोहर सुरवाडे
सलीम पिंजारी
दि. 27 फेब्रु.2020 रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख डॉ.मनोहर सुरवाडे यांनी वरील प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले. त्यात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉक्टर जगदीश पाटील विद्यार्थ्यांना मराठी भाषेची महती स्पष्ट करून मराठी साहित्यातील थोर लेखक वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेची केलेले सेवा विद्यार्थ्यांना पटवून मराठी भाषेची महिमा सांगितली. शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, फैजपूर येथील मराठीचे प्राध्यापक श्री विजय तायडे यांनी सुद्धा मराठी विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरवाडे यांनी अध्यक्षीय समारोप पर मार्गदर्शन करताना मराठी भाषेला अतिशय समृद्ध अशी परंपरा असून अतिशय प्राचीन अशी भाषा आहे. ही भाषा दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होत आहे. असं केल लेखक-कवी त्यामध्ये लेखन करीत आहेत. म्हणून भाषेची काळजी करण्याचे कारण नाही. या भाषेच्या संवर्धनासाठी प्रचार प्रचारासाठी अनेक घटक कार्यरत आहेत म्हणून मानव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या भाषेची काळजी करण्याचे कारण नाही, असे ठामपणे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.शरद बिहाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागातील एम ए भाग 1 व 2 च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.






