Chandwad

प्रा. महेश वाघ यांचा भारत विकास प्रबोधिनीचा राष्ट्रीय भारतरत्न मदर तेरेसा पुरस्काराने सन्मान

प्रा. महेश वाघ यांचा भारत विकास प्रबोधिनीचा राष्ट्रीय भारतरत्न मदर तेरेसा पुरस्काराने सन्मान

उदय वायकोळे चांदवड

प्रकाशन क्षेत्रात कार्य करतांना सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवण्याऱ्या भारत विकास प्रबोधिनीचे शांती आनंद एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीच्या स्थापना दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या घटकांची दखल घेत भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड २०२१ या राष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने प्रा. महेश वाघ यांना सन्मानित करण्यात आले. कोरोनाकाळात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची तसेच आपापल्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. रविवार, १२ डिसेंबर २०२१ रोजी पुरस्कार वितरण नाशिकमध्ये करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आपण देत असलेल्या योगदानाचा भारत विकास प्रबोधिनी, विकासाची वाट विचार मंच आणि शांतीआनंद एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी परिवाराला अभिमान वाटतो. याच हेतुने पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिने अभिनेते मा. प्रशांतजी गरुड (तुझ्या माझ्या संसाराला मालिकेतील आप्पासाहेब), सिनेअभिनेत्री मा. प्रिया सुरते ( ब्रँड अँबेसडर, विकासाची वाट निसर्ग संवर्धन समिती), मिसेस युनिव्हर्सल इंटरनॅशनल मा. संगीत खैरनार (ब्रँड अँबेसडर, भारत विकास प्रबोधिनी), भारत विकास प्रबोधिनी प्रकाशनचे अध्यक्ष विजयकुमार इंगळे (नाशिक) यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात गेल्या 10 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतांना सामाजिक कामातून आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या प्रा. महेश वाघ यांना भारत विकास प्रबोधिनी व विकासाची वाट विचार मंच तर्फे भारत रत्न मदर तेरेसा राष्ट्रीय पुरस्काराना सन्मानित करण्यात आले. भव्य दिव्य सन्मानचिन्ह, विशेष गौरव चिन्ह, मदर तेरेसा मेडल, मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांच्या पुरस्कार निवडीबद्दल विविध स्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे. यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button