निर्मिती ग्रुपच्या उपक्रमाचा आदर्श इतरांनी घ्यावा- प्रवीण नाना जाधव
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
आदिवासी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्मिती ग्रुपच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप केले असून यांचा आदर्श घेऊन इतर सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आव्हाहन मविप्र संस्थेचे कार्यकारी संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले.
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पेठ तालुक्यातील मोहपाडा येथील माध्यमिक विद्यालयास, विद्यार्थ्यांसाठी निर्मिती उद्योग समुह व संलग्न संस्था यांच्या पुढाकारातून विद्यालयास कॉम्पुटर ,प्रोजेक्टर , सर्व विद्यार्थ्यांना बूट ,कपडे ,शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुबलक प्रकाश असावा यासाठी टूब लाईट ,पंखा ,विद्युत साहित्य ,साउंड सिस्टीम ,फलक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी वेगवेगळे प्रसाधन गृह ई . वस्तु मविप्र संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव ,संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या .त्या प्रसंगी प्रवीण नाना जाधव बोलत होते.
ते पुढे म्हणाले आदिवासी व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निर्मिती समुहाने उचलेला खारीचा वाटा समाजात एक आदर्श निर्माण करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपक्रम असून यांचा आदर्श घेऊन इतर संस्थानी ही गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा असेही आव्हाहन जाधव यांनी केले.
हा उपक्रम निर्मिती ग्रुपचे संचालक विवेक कुलकर्णी व प्रीतीश गोडांबे यांच्या संकल्पनेतून राबविन्यात आला .निर्मिती ग्रुपचे सदस्य हर्षलकुमार गांगुर्डे ,लक्ष्मण पाटील ,महेंद्र निकम ,रामदास भांड ,योगेश डफाळ ,गणेश मेधने ,संदीप कसबे ,यासीन सय्यद ,मधुकर दराडे व ग्रुपशी संलग्न संस्था चालक गणेश नागरे ,शैलेश ताकाटे ,राहुल आरोटे ,राजेश पाटील ,विजय अनिकेवी ,सचिन दातीर ,गौरव पिंगळे ,समीर महाजन ,अभय धोंड ,सतेंद्र दुबे ,अंकुश पाटील ,सौ .मनीषा मोरे . यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
निर्मिती समुहाचे अश्या प्रकारच्या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी निर्मिती समुह सदैव अग्रेसर राहील असे निर्मिती समुहाच्या वतीने रामदास भांड यांनी आश्वासित केले .
फोटो-
निर्मिती ग्रुपच्या वतीने पेठ तालुक्यातील मोहपाडा जनता विद्यालयास विविध शालेय उपयोगी साहित्य स्वीकारताना मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव शिक्षण अधिकारी डॉ. भास्कर ढोके निर्मिती ग्रुपचे सर्व पदाधिकारी






