प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब पाहणी करतात कंटेनमेंट झोन ची
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर प्रभाग क्रमांक 17मध्ये कॅंटोन्मेंट झोन मध्ये असताना हि प्रांताधिकारी सचिन ढोले स्वतः महात्मा फुले चौक महापौर चाळ न्यू बागवान मोहल्ला येथे जाऊन पाहणी केली, आणि तेथील स्थानिकांना काळजी घेण्याचं आवाहन केले आणि कुणीही घाबरून जाऊ नका प्रशासन आपल्या बरोबर आहे.
याची खात्री दिली.तेथील प्रभागाचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागांमध्ये वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करतात, जंतू नाशक फवारणी करतात आणि सर्वांच्या अडीअडचणीत त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमध्ये केलेल्या विविध प्रकारच्या कामांसाठी विशेष कौतुक केले.
यावेळी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर साहेब नगराध्यक्ष नागेश काका भोसले माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे नगरसेवक बजरंग देवमारे नगरसेवक अमोल डोके नगरसेवक डी राज सर्वगोड स्वयंसेवक असलम बाबा बागवान उल्हास शिंदे पत्रकार रफिक आतार आदी उपस्थिती होते






