पोलखोल…अवैध व्यवसाय का बंद केले नाहीत..? उलट अवैध धंदे करणारे आमदारांचे कार्यकर्ते जोमात…
अमळनेरकरांनो खास आपल्या साठी घेऊन येत आहे नवीन सिरीज “प्रश्न सामान्य जनतेचे उत्तर आमदारांचे”..पोलखोल..पोलखोल…
ह्या मालिकेत आपण विद्यमान आमदार जे बिलकुल भूमिपुत्र नाहीत येथूनच चाट मारायची सुरुवात होते…त्यांनी मारलेल्या गप्पांचा ऊहापोह करणार आहोत…
अमळनेर येथील आमदार अनिल पाटील यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या वलग्ना वेळोवेळी केल्या आहेत.चौधरीबंधूंनी अवैध धंदे बंदे करून एक नंबरचे व्यवसाय सुरू केल्यास मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे. त्यांचे सर्वच प्रकारचे अवैध व्यवसाय असून अशा व्यवसायांना व व्यवसायिकांना ते प्रोत्साहन देतात. ब्रुक फार्मा कंपनीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही त्यांनी काळाबाजार केला. याप्रकरणी आपण पाठपूरावा करणार व हा विषय धसास लावणार असल्याची राजकीय वल्गना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पत्रपरिषदेतून केली होती.
दरम्यान, याच रेमडेसिवीर प्रकरणावरून आमदारांना उत्तर देण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू प्रा.डॉ.रवींद्र चौधरी यांच्याविशयीचा जनमानसात जो गैरसमज आमदारांनी फैलावला आहे तो दूर व्हावा व आमदारांचे खरे स्वरूप जनतेला कळावे, यासाठी आमदार श्री.शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे(आघाडी) जाहीर पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले होते. त्यात चौधरीबंधूंच्या हिरा उद्योग समुहाअंतर्गत विविध व्यवसाय राज्यभर आहेत. शहरात वैध, अवैध त्यांचा कोणताही व्यवसाय नाही. शहरात अवैध व्यवसाय करणारे हे आमदारांचे नातलग व निकटवर्तीय कार्यकर्ते असून अनिल पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असून त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हे धंदे बंद करूनच दाखवावेत असे खुले आव्हान दिले होते. ते आजही कायम आहे. पण एकही धंदा शोधून काढण्यात ह्या आमदार साहेबांना यश आलेले नाही.
याच पत्रकात आमदारांच्या निकटवर्तीय कार्यकर्ते यांचे कुठे कुठे अवैध धंदे आहेत याची यादीच प्रकाशित करण्यात आली होती.
यात राजू फाफोरेकर यांचा धुळे रोडवर मोठा पत्त्यांचा जुगार अड्डा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संजय भिला पाटील यांचा पायल हॉटेलच्या मागे जुगार अड्डा आहे. पैलाड नाका परिसरातील बापू टेलर व त्यांचे भाऊ मटका किंग व मटका बुकी आहेत. न्हानूभाऊ पाटील हे मटका बुकी आहेत. नगाव येथील मनोहर पाटील हे मटका बुकी आहेत. असे मटका बुकी, जुगार माफिया व रेती तस्कर असणारी ही मंडळी आहे. ही सर्व सर्वसामान्य, कष्टकरी जनतेस लुटणारी गॅँग आहे. तर आमदारांचा भागीदार सडावण येथील विजू साळुंखे, बाळू पाटील, भटू पाटील, आमदारांचा भाऊ शुभम पाटील, आरिफ खाटीक, मेवाती हे सर्व रेती तस्कर आहेत.सरार्स अवैध वाळू उपसा करत दिवसरात्र वाहतूक केली जाते. ही मंडळी शासनाचा महसूल बुडवत रेती उत्खन्नन करून ट्रॅक्टर, डंपरने वाहतूक करतात. तसेच आमदारांच्या नावाने त्यांच्या बॉडीगार्डनेही मोठा अवैध वाळू उपसा करण्याचा सापटा चालविला आहे. आमदारांनी संबंधितांचे हे धंदे बंद करून दाखवावेत जनतेची व शासनाची लूट थांबवावी. तसे केले नाही तर आमदारांची भागीदारी आहे अथवा त्यांना हप्ते मिळतात हे सिद्ध होईल, असे पत्रकात नमूद केले होते. या प्रसिद्धी पत्रकावर आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवारातील सदस्यांच्या स्वाक्षर्या होत्या.हे आव्हान पद सिद्ध आमदारांना पेलता आले नाही. त्यांनी स्विकारले नाही अथवा त्याचे खंडणही केले नाही यामुळे तालुक्यात न उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. जनतेमध्ये याविषयी संभ्रम निर्माण झाला असून तो दूर करावा. अशी मागणी केली जात आहे.जनता हुशार आहे योग्य आणि अयोग्य ची जाणीव होत आहे किंवा झाली आहे या अनुषंगाने अनेक ठिकाणी सामान्य जनतेत ही अवैध धंद्यांची चर्चा रंगली आहे.पोलीस महसूल प्रशासन कोणतीही कार्यवाही ह्या आमदारांच्या अवैध धंदे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर का करत नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मांजराला नेहमी वाटत की आपण डोळे मिटून दूध पित आहोत आपल्याला कोणी पाहणार नाही पण मांजर सोडून सर्वांनाच हे माहीत असत की दूध कोण पीत आहे.लोकांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू असून तोडीपाणी,मांडवली झाली काय? फक्त बोलण्या पुरतेच आवाहन होते काय?ते “दादा” मंडळींना घाबरले काय? ताकद कमी पडली काय? इथून तर फक्त राजकीय स्टंट होता का? प्रसिद्धी मिळविण्यासाठी पत्रकार परिषदेत हा मुद्दा घेतला का? स्वतः पद सिद्ध आमदार रेमीडिसिव्हियर इंजेक्शन उपलब्ध करू शकले नाहीत म्हणून पोट दुखलं काय? इथं पर्यंत चर्चेला उधाण आले आहे. आता सुज्ञ आमदारांनी यावर जरूर उत्तर द्यावे तेही अगदी रितसर हं..!उगीच उलट्या कोलांट्या उड्या नकोत..असे ही जनतेने मत व्यक्त केले आहे.






