Nashik

कविता म्हणजे कवीची अभिव्यक्ती

कविता म्हणजे कवीची अभिव्यक्ती

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

कोणतीही कविता तेव्हाच दुसऱ्याच्या हृदयाचा ठाव घेते जेव्हा त्यात समोरच्या व्यक्तीच अस्तित्व जाणवतं कवितेने भारतीय वाडमय प्रकारात मोलाचे स्थान निर्माण केलेले आहे मराठी भाषेला लाभलेल्या अनेक सारस्वतांनी आपल्या कविता जगाच्या कानाकोपऱ्यात भाव विश्व निर्माण करणाऱ्या पोचवल्या आहेत असे मत नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ अध्यक्ष सुरेश सलादे यांनी व्यक्त केले मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या खेडगाव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर रतनगड या परिसरात सुरू आहे या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते करण्यात आले यासम संस्कार शिबिरात बी के कावळे विद्यालय रामनगर येथील शिक्षक व नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ चे जिल्हाध्यक्ष सुरेश माधवराव सलादे यांनी कविता आणि आपण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री सलादे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना म्हटले की कविता रुदयाचा ठाव तेव्हाच घेते जेव्हा त्या कवितेचे भावबंद हे वाचणाऱ्याला किंवा ऐकणार्‍याला आपले वाटतात नाशिक जिल्ह्या त्यातून अनेक कवी व साहित्यिक हे दर्जेदार निर्माण झालेले आहे कविता आपलेपणाची भावना जिथे व्यक्त करते तिथे ती समोरच्याला आपल्याशी करते आणि म्हणून कवींनी लिहिते होताना समाजाच्या भावभावनांचा विचार करून त्यांचे प्रतिबिंब आपल्या काव्यात उतरावावे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्राध्यापक शिंदे यांनी केले तर आभार श्री महेश ठुबे यांनी मानले प्राध्यापिका ठरले यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी सटाणा कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर कैलास सलादे पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे प्रा आहेर बोरसे यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमात कवि युवराज सगर प्राध्यापक कैलास सलादे यांनी आपल्या कविता सादर केल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button