Maharashtra

पर्यावरण संरक्षणसाठी लॉकडाऊन काळातही संस्थापक देवा तांबे यांचे माळरानावर वृक्षारोपण व संगोपन

पर्यावरण संरक्षणसाठी लॉकडाऊन काळातही संस्थापक देवा तांबे यांचे माळरानावर वृक्षारोपण व संगोपन

प्रतिनिधी पी व्ही आंनद

गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे.
दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे. दुष्काळ निवारण आणि महाराष्ट्राचा समृध्द शाश्वत विकास करण्यासाठी वन लागवडीच क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अनेकदा वृक्षलागवडीचे कार्यक्रम राबविले गेले, त्यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला, परंतु वन लागवडीचे क्षेत्र किंवा जंगल क्षेत्र म्हणावे तेवढे वाढू शकले नाही हे खेदाने नमूद करावे लागते.
त्यामुळेच सुरुवात स्वतः पासून करावी असा निर्धार करत पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत या संपूर्ण भारत देशांत पर्यावरण संरक्षण व समाजसेवेचे कार्य करणाऱ्या संघटनेचे संस्थापक श्री.देवा तांबे यांनी लॉकडाऊन काळात बारामती विभागात असलेल्या ओसाड माळरानावर वृक्षारोपण केले आहे. संपूर्ण लॉकडाऊन काळात कडक उन्हात या सर्व झाडांना दूरवरून विहिरीतून पाणी काढून घातले जात आहे. याच माळरानावर दररोजच हरीण,ससे,लांडगे तसेच विविड प्रकारचे पक्षी अशा बऱ्याच प्रकारच्या पशू पक्ष्यांचे कळप भटकत असताना पहावयास मिळते आहे. यांवरून हें स्पष्ट होते, कि याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी जंगल असावे आणि त्याच त्यांच्या हक्काच्या घराचा जंगलाचा शोध सध्या हें प्राणी घेत आहेत. हें पर्यावरण संस्थेचे संस्थापक देवा तांबे यांनी जाणून हां संपूर्ण माळरान हरित करण्याचा,याठिकाणी जंगल तयार करण्याचा निश्चय केला आहे.
तसेच पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत संघटनेच्या महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी मार्फत प्रत्येक जिल्ह्यात वनविभागाच्या असलेल्या ओसाड माळरान,टेकडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा विचार श्री.देवा तांबे यांनी व्यक्त केला आहे.
वृक्षारोपण व संगोपन काळाची गरज व प्रत्येकाची जबाबदारी आहे , ‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. असे प्रखर विचार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button