वाहन चालकाच्या बेजबाबदार पणा मुळे नाल्यात पडली पिक-अप गाडी.
सुदैवाने मोठी जीवित हानी टळली
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सविस्तर वृत्त असे कि जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथील ख्वाजा गरीब नवाज नगर भागात मस्कावद रस्त्यावर ख्वाजा नगर गेट चढती वर न्यूटल अवस्थेत उभी केलेली
पिक अप गाडी वाहन अचानक पणे माघे सरकली व पवित्र रमजान महिन्या चे उपवासाचे साहित्य खरेदी करणारे रोजादार व मस्कावद कडे ये जा करणारे नागरीक यांच्या जवळून घसरत घसरत नाल्यात पडल्याची घटना घडली. रमजान महीना सुरू असल्याने त्या भागात नेहमीच रोजादार व उपवासाचे पदार्थ खरेदी करण्या साठी मुस्लिम बांधवांची वर्दळ सुरु असते. तसेच सावदा ते मस्कावद व दसनूर , शिंगणुर , सुनोदा , तांदलवाडी व इत्यादि गाव खेडयांचे नागरीक यांचीही वर्दळ सुरु असते.
दि. 10/05/2020 रोजी संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान ख्वाजा गरीब नवाज नगर मुख्य प्रवेशद्वार समोरील चढती वर कांदा गोन्या भरलेली सफेद रंगाची माल वाहतूक पिक अप क्रमांक MH 15 G 9750 चालक सुभाष सोनार रा.हतनुर धरण यांनी गाडी न्यूटल ठेऊन गाडी च्या टायर ला एका अल्पशा दगड टेका लावून उभी केल्याने काही क्षणातच टायर खालचा दगडी टेका निसटला व थेट नाल्यात पडली त्या वेळी चालकाचा पुतण्या सुध्दा माघे बसलेला होता परंतु दैव बलवत्तर त्याचे जीव वाचले. अशा बेजबाबदार पणे न्यूटल अवस्थेत चढती च्या ठिकाणी अल्पश्या दगडी टेकयावर उभी करणाय्रां चालकाच्या बेजबाबदारी व हलगर्जी पणे ने नाल्यात घसरत गेलेल्या गाडी ने बरेच जणांचे गाडी खाली येऊन जिव गेले असते. महणुन त्या चालका वर कायदेशीर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे जेणेकरुन भविष्यात लोकांच्या जीवा शी खेळणारे बेजबाबदार वाहन चालक यांना सिख मिळेल. तर पोलिसांकडुन या घटने ची त्वरीत दखल घेतली जाईल की नाही? त्या चालका वर गुन्हा दाखल होणार की नाही? या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
*कौतुकास्पद*
परिणामी नाल्यात पडलेली गाडी व कांदया गोणया त्या भागातील मुस्लिम तरुणांनी बाहेर काढण्यास त्या बेजबाबदार चालकास मदत केली. या काळात त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्या ने त्या घटनेशी अनेकांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे.






