पंढरपूर तालुक्यतील वंचित 8 हजार कुटुंबाला मिळणार रेशनधान्य
शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या प्रयत्नाला यश
प्रतिनिधी रफिक आतार
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा भाळवणी ग्रामीण भागातील गरीब शेतकरी व शेतमजूर यांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अध्यापपर्यंत अनेक रेशनकार्ड धारकांना काही तांत्रिक अडचणीमुळे स्वस्त धान्य दुकानातून रेशनधान्य मिळत नाही. अशा सर्वसामान्य लोकांना कोरोना पार्श्वभूमीवर या ऑनलाइन कुटुंबाना रेशनधान्य मिळावे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट पत्रव्यवहार करून ई-मेल द्वारे निवेदन दिले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच वंचित असलेल्या तालुक्यातील सुमारे आठ हजार कुटुंबाला रेशनधान्य मिळणार आहे.
लॉक डॉउनमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यांच्यापुढे रोजच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या तीन योजनाव्यतिरिक्त रेशनकार्ड ऑनलाईन असूनसुद्धा इष्टांग पूर्ण नसल्याने वंचित राहिलेले व ऑनलाईन न झाल्याने त्या लोकांना स्वत धान्याचा लाभ भेटत नाही. त्यामुळे लॉक डॉउन काळात तर अशा लोकांचे हाल होत आहेत. त्यातच मजूर लोकांना याची जास्त झळ पोहोचत आहे. त्या अनुषंगाने सर्वसामान्य व गरीब कुटुंबापर्यंत रेशन धान्य मिळावे यासाठी शासनाने ऑफलाईन असलेल्या सर्वच रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून माल मिळावा अशी मागणी होत होती. या सर्वसामान्य लोकांची मागणी लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या कडे लेखी पत्रव्यवहार करून ई-मेल द्वारे निवेदन देऊन ऑनलाइन कार्डधारकांप्रमाणे ऑफलाईन कार्डधारकांना या लॉक डॉउन काळात सवलतीच्या दारात स्वस्त धान्य दुकानातून माल मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीचा विचार करून तात्काळ याची शासन दरभारी दखल घेऊन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांनी याबाबत आदेश पारित केले आहेत. त्यानुसार लवकरच या वंचित सर्व रेशनमाल धारकांना गहू 8 रुपये व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दारात प्रतिमहा प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ असे 5 किलो अन्नधान्य स्वस्त धान्य दुकानामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शासनाने तात्काळ घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागातून स्वागत होत आहे. त्याचबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे आभार मानले जात असून आता हा रेशनमाल मिळण्याची प्रतीक्षा सर्वसामान्य लोकांना लागली आहे.






