sawada

सावदा येथील जेष्ठ पत्रकार शाम पाटील यांना पद्मश्री डॉ.मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर

सावदा येथील जेष्ठ पत्रकार शाम पाटील यांना पद्मश्री डॉ.मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :-रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील जेष्ठ पत्रकार तथा लेवाजगत या वृत्ताचे संपादक श्याम वसंत पाटील हे ४० वार्षापासून पत्रकारिता करीत असून या दरम्यान ते सावदा न.पा.चे नगरसेवक देखील होते. त्यांना सामाजिक, भौगोलिक,राजकीय,संस्कृतीक, कृषी,धार्मिक,शिक्षण,क्रिडा असे विविध क्षेत्राचा चांगलच अनुभव आहे.तसेच ते जनहिताकरिता निर्भीडपणे आपली धारदार लेखीणीतून सतत अन्या अत्याचार विरोधात बातम्या प्रसारित करतात यामुळे अनेकांना न्याय देखील मिळते,तरी इतरांना हेवा सुटेल अशा प्रकारे पत्राकारीतेच्या मैदानात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी मुळे वचक निर्माण करणारे,व ताप्ती सातपुडा या पत्रकार संस्थे अध्यक्ष असलेले बहुचर्चित व्यक्तिमत्व श्याम वसंत पाटील यांच्या सदरील कार्याची दखल घेऊन त्यांचे नाव राष्ट्रभक्तीने प्रेरित होउन समर्पित भावनेने विवीध क्षेत्रांत निष्काम कर्मयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आल्याने,सदरील जेष्ठ पत्रकार श्याम वसंत पाटील यांना मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने (पद्मश्री डॉ.मणीभाई राष्ट्रीय सेवा पुरस्कार)जाहीर करण्यात आले असून या पुरस्कारांचे सन्मानपूर्वक वाटपाचे कार्यक्रम दि.२७ एप्रिल लोकशाहीर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ८ वाजेच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर गुंजन टॉकीज जवळ येरवडा पुणे येथे होणार आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार उन्मेषदादा भैयासाहेब पाटील तर आमदार सुरेश तथा राजुमामा भोळे,डॉ.संजय कोलते आय.ए.एस प्रमुख कार्यकारी संचालक स्मार्ट सिटी पुणे, अनुव्रतश्री डॉ.ललीता जोगड साहित्यिक मुबई,संजय देशमुख अध्यक्ष अभा लोकस्वातंत्र पत्रकारमहासंघ अकोला, निनाभाऊ खर्चे अध्यक्ष पिपंरी चींचवड लेवा पाटीदार संघ, सचिव नीतिन बारसू बोंडे,डी.के. देशमुख भ्रातृमंडल बुलडाणा,डॉ. अशोक के पाटील उपाध्यक्ष डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान सह इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित राहील.अशी माहिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार,प्रबोधनकार,डॉ रविंद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान ह्यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button