योगा डे निमित्त एकम योगा चॅलेंजचे आयोजन…
नाशिक : जगभरातील योगा प्रेमींसाठी ‘एकम योगा चॅलेंज’ या अनोख्या ऑनलाईन मोफत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनमुक्त संत आणि तत्वज्ञानी श्री प्रीताजी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सोमवारी (ता. २१) एकवीस मिनिटांसाठी हे योगा चॅलेंज असेल. यामध्ये हठयोग, कर्मयोग, राजयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग शिकवले जाणार आहे.
योगा प्रेमींना आपल्या घरामध्ये बसून, ग्रुपमध्ये किंवा कार्यालयातील सहकाऱ्यांसह ऑनलाइन स्वरूपात सहभाग घेता येईल. खाली दिलेल्या लिंकद्वारे स्पर्धेत सहभाग घेता येईल.






