Maharashtra

किल्लारी पोलीस स्टेशनचे पीएसआय अमोल गुंडे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक महिन्याचे वेतन

किल्लारी पोलीस स्टेशनचे पीएसआय अमोल गुंडे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक महिन्याचे वेतन*

औसा प्रतिनिधी प्रशांत नेटके

कोरोना सारख्या गंभीर स्थितीत आपले एक योगदान म्हणून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करण्याचे धाडस औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी केले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचारी व नागरिकांनी शक्य असेल तितकी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र पोलीस प्रशासन जनतेसोबत ठाम उभे आहेत. महाराष्ट्र पोलीस प्रशासनाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यासाठी हातभार लागावा या हेतूने महाराष्ट्र पोलीस प्रशासनातील लातुर जिल्ह्यातील किल्लारी पोलीस स्टेशनचे पीएसआय अमोल गुंडे यांनी कोरोना विरोधी लढ्यासाठी आपले एक महिन्यांचे आपले वेतन असताना प्रशासनातील एक जबाबदारी पार पाडल्याबाबत पीएसआय अमोल गुंडे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.कोरोनाच्या संकट काळात पोलीस प्रशासनाच्या वतीने आपले एक महिन्यांचे वेतन देणारे गुंडे हे बहुधा लातुर जिल्ह्यातील पहिलेच पोलीस कर्मचारी आहेत,त्यांच्या या कार्याचा आदर्श पोलीस प्रशासनातील इतर पोलिसांनी नक्कीच घेण्यासारखा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button