पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्धगाव स्पर्धेचे एक दिवसीय प्रशिक्षण
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेतील गावकरी यांना तालुक्याच्या ठिकाणी पुढील महिन्यात देणार असल्याचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ साहेब यांना पत्र दिले व समृद्ध गाव स्पर्धेच्या एक दिवशीय प्रशिक्षणा विषयी सविस्तर माहिती दिली तहसीलदार साहेब यांनी स्वतः मीदेखील या प्रशिक्षणास येईन व आमची प्रशासकीय टीम तलाठी मंडल अधिकारी तसेच कृषी चे कृषी सहाय्यक व मंडल अधिकारी व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व रोजगार सेवक तसेच गट विकास अधिकारी व कृषी अधिकारी यांना देखील आम्ही प्रशिक्षणास संदर्भात सूचना देऊ असे तहसीलदार साहेब यांनी सांगितले त्याचबरोबर समृद्धी गाव स्पर्धेतील गावे समृद्ध बनवण्यासाठी प्रशासकीय टीमला सुद्धा हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचे ठरेल असे तहसीलदार साहेब यांनी सांगितले त्याचबरोबर समृद्ध गाव स्पर्धेतील प्रशासकीय कामे करण्यासंदर्भात ज्या काही अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू असे तहसीलदार साहेब यांनी सांगितले






