Maharashtra

तालुक्यातील बाभूळ वने नष्ट होण्याच्या मार्गावर

तालुक्यातील बाभूळ वने नष्ट होण्याच्या मार्गावर

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

तालुक्यातील व परिसरातील ग्रामीण भागातील गावाबाहेरील, शेतातील बाभूळ वने नष्ट होण्याच्या मार्गावर आलीले दिसून येत आहेत बाभळीचे तीन प्रकार असून काटेरी काळी बाभूळ विदर्भात सर्वत्र प्रसिद्ध आणि उपयुक्त आहे ग्रामीण भागात बाभळीची झाडे कुठेही दिसून येत असतात परंतु दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने घरे बांधायच्या प्रश्न निर्माण झाला व गावांच्या कक्षा रुंदावत गेल्या व जागेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे गावालगत नवनव्या वस्तू उभ्या करण्यासाठी जमिनीच्या मोठ्या प्रमाणात वापर होत आहे त्यासाठी येथील बाभळीसह इतरही झाडे कापली जात आहे…
शेतावरील धूरावरच्या बाभळीचे चे अस्तित्व धोक्यात आलेली पाहायला मिळत आहे एक वेळेस शेतीचे पोटहिस्से झाल्याने शेतावरील धुळ्याची ही रुंदी कमी होत गेली बाभळीच्या झाडांच्या सावलीने पिके होत नाही या कारणाने बाभळीचे झाड सर्रासपणे कापली जात आहेत ग्रामीण भागात बाभळीच्या झाडापासून मिळणारा डिंक व शेंगा औषधासाठी वापर करत असतात तर उन्हाळ्यामध्ये शेतकरी शेळ्यांसाठी शेंगाचा चारा म्हणून उपयोग करत असतात,
पावसाळ्यामध्ये हे काटेरी झाड असल्यामुळे पक्षी आपले घरटे बांधत असायचे त्यामध्ये चिमणी, कावळा, बगला असे पक्षी या झाडाचा वापर करत होते या झाडावर सरडे सुद्धा दिसत होते परंतु अनेक झाडे कापली गेली त्यामुळे पक्ष्यांचे पावसाळ्यात यांचे घरटे चिंच, वळ, पिंपळ, करंजी व ईतर झाडावर पाहायला मिळत आहे पूर्वी शेतकरी जंगली प्राण्यांपासून शेतीत असलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे त्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून कुम्पण करत असायचे तर झाडाचा पाला हा दात घासण्यासाठी वापर करत होते, जेव्हा शेतकरी शेतात नांगरणी, वखरणी करत असताना शेतातील झाडावर बसलेले पक्षी हे किडे खाण्यासाठी येत असायचे व शेतकऱ्यांना पिकावर होणारा रोगापासून संरक्षण द्यायचे परंतु बाबुळ,सुबाभूळ, व निलगिरी शासनाने वन अधिनियमातून वेगळे केले आहेत त्यामुळे या झाडांच्या लाकडांची मुक्तपणे वाहतूक करता येते याचा फायदा शहरातील मोठे व्यापारी ही घेताना दिसत आहे..
ग्रामीण भागात शहरातील व्यापाऱ्यांची ठेकेदार काम करीत असून ते बाभळीचे झाड ठोक भावाने शेतकऱ्यांकडून विकत घेत असून साधारणता एका झाडाला नऊशे ते हजार रुपये किंमतीने विकत घेतल्या जाते व ठेकेदार स्वतः झाडे तोडून शहरातील ठोक व्यापाऱ्यांना जास्त भावाने विकत असतात नवीन इमारतीच्याबांधकामासाठी कच्चामाल म्हणून या लाकडाचा वापर केला जातो यासाठी बाभळीच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने तालुक्यात कापली जात आहे….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button