बाळासाहेबांची शिवसेना पक्ष (तालुका अमळनेर )यांच्या वतीने एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पू.सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर येथे मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप कार्यक्रम संपन्न
रविवारी दिनांक 12/2/2023 रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अमळनेर तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथची शिंदे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त कुठलेही बॅनर बाजी अनावश्यक खर्च न करताहोतकरू विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडविण्यासाठी तसेच जीवनात यशाची उंच भरारी घेण्याकरिता उपयुक्त स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन व मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटपाचा कार्यक्रम पू.सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर येथे आयोजित केला.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते मार्गदर्शक म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख विजय पवार सर, कुंदन खैरनार, नितेश जाधव, पोलिस कर्मचारी चंदन पाटील….इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.






