ऑलिम्पिक Breaking… वेटलिफ्टिंग मध्ये भारताला रौप्यपदक… इतिहास रचला
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचलत रौप्यपदक कमावलं आहे
काल भारतीय वेळे नुसार शुक्रवारी टोकियोत कोरोना नियमांचे पालन करत ऑलिम्पिक स्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले. भारताचे 28 सदस्यीय पथक सोहळ्यात सहभागी झाले.
आज शनिवारी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दिवशी मीराबाई चानुने रौप्यपदकावर नाव कोरत इतिहास रचला.यामुळे भारताची दमदार सुरुवात झाली असून आता प्रतीक्षा अधिक चमकदार कामगिरी ची आहे. सध्या भारत 7 व्या क्रमांकावर असून हा फलक निश्चितच उंचावणार आहे.मीराबाई ह्या रौप्य पदक विजेत्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
पदक पटकावल्याने प्रचंड आनंद झाला आहे. संपूर्ण देश माझा सामना पाहत होता. देशवासीयांच्या अपेक्षा माझ्यावर केंद्रित झाल्या होत्या. मी थोडीशी दडपणात होते. पण सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा निर्धार मी केला होता. या पदकासाठी मी अविरत मेहनत घेतली आहे. सुवर्णपदकावर नाव कोरण्याचा कसोशीने प्रयत्न केला. सुवर्णपदक जिंकू शकले नाही. पण मी सगळे प्रयत्न केले. मी दुसऱ्यांदा वजन उचललं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं पदक पक्कं झालं या शब्दात मीराबाईने आपल्या भावना व्यक्त केल्या.






