NPR विषयी शहरात मुस्लिम समाजातील सर्व धर्मगुरू, विविध बिरादरिंचे अध्यक्ष, विविध सामाजिक संगठनांचे अध्यक्ष, नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न
फहिम शेख
नंदुरबार ए आई एम आई एम नंदुरबार जिल्हाध्यक्ष यांनी येत्या 01 एप्रिल 2020 पासुन संभावित NPR विषयी शहरात मुस्लिम समाजातील सर्व धर्मगुरू, विविध बिरादरिंचे अध्यक्ष, विविध सामाजिक संगठनांचे अध्यक्ष, नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक यांची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते, सदर बैठकीत जवळ जवळ सर्वांनी आपली उपस्थिती दर्ज केली.
या बैठकीचे प्रास्ताविक डॉ. मतीन यानी केले नंतर कायद्याच्या दायरामधे राहुन विरोध कसा करता येईल यावर जमियत महमूद मदनी चे मौल्वी जकरीया, जमियत अर्शद मदनीचे मुफ्ती शाहरुख, नगरसेवकाच्या वतीने फरीद मिस्त्री, AVHF चे आरिफ कमर शेख, धोबी बिरादरीचे अध्यक्ष शफी चाचा, भारत मुक्ती मोर्चाचे हाजी लालू खान, उमर मशीदचे इमाम मौल्वी जावेद, मौल्वी गुलाब, इस्माईल दगू फाऊंडेशन चे एजाज बागवान, मुस्लिम हलालखोर बिरादरीचे अर्शद हुसैन, बेघर संघर्ष समितीचे दिलावर शाह, पप्पू कुरेशी, शोएब खाटिक आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून महत्वपूर्ण सूचना केले. शेवटी जिल्हाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन यांनी सर्व सूचनावर अंमलबजावनी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्यास सर्वांना आव्हान केले असून सर्वांनी ग्वाही दिली.
NPR ला विरोध का व कसा ?
हे प्रत्येक घरावर जाऊन लोकांना समजावीने तसेच सहमत असलेल्या प्रत्येक घरावर NPR ला विरोध दर्शवणारे स्टिकर तैय्यार करून लावण्यात येईल तसेच सोशल मीडीयावर ही कायदेतज्ञांच्या माध्यमाने माहिती देण्याचे काम संपूर्ण ताकदीने करण्याचे ठरविले आहे.
सदर कार्यक्रमात असंख्य लोकांनी हजेरी लावली, सूत्रसंचलन सैय्यद फरहत हुसैन यांनी केले असून सर्वांचे आभार ही मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यात एम आई एम पक्षाचे शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता व हित चिंतकांनी मेहनत घेतली.






