Maharashtra

आता तरी  स्वतः ला आवरा समोर मृत्यू चे तांडव आहे घरी थांबा – नितीन जाधव

आता तरी स्वतः ला आवरा समोर मृत्यू चे तांडव आहे घरी थांबा – नितीन जाधव

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

मनुष्यप्राणी हा पृथ्वीवरील सर्वात जास्त बुद्धीमान व समाजप्रिय प्राणी आहे. प्राचीन काळापासुन मनुष्य नवनवीन गोष्टी आत्मसात करत स्वतःची प्रगती करतो आहे त्याचबरोबर समाजाची व देशाची प्रगती व्हावी म्हणून झटत आहे. सर्वच बाबतीत आपण स्वयंपूर्ण असावे म्हणून तो धडपडत असतो शिवाय विविध प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली बुध्दीमत्ता पणाला लावत असतो.

भारतात अनेक परकीय राजवटीने साम्राज्यवादाच्या लालसेपोटी आक्रमण करत सत्ता काबीज केली पण भारतीयांच्या ऐक्यासमोर व मुत्सुद्देगिरीसमोर कोणीच तग धरु शकले नाही. अशाच प्रकारे देशावर चाल करुण आलेले कोरोना संकट सुध्दा आपल्या देशभक्तीसमोर ऐक्यासमोर टीकू शकणार नाही .

आज जगभर कोरोना विषाणू मुळे हाहाकार माजला असून अमेरिका ,चीन ,ईटली ,स्पेन,जर्मनी व आता भारता मध्ये कोरोना साथरोगाने मानवाला मृत्यूने कवटाळल्याचे सर्वत्र दिसते आहे.

देशात लाॕकडाऊन अंतिम टप्प्यात असताना व शासनाने कलम 144 सह साथरोगप्रतिबंधीत कायदा लागू केला असताना सुध्दा आपण घरी थांबण्यास तयार नाहीत. आपण स्वतः ला सुशिक्षित ज्ञानी देशभक्त म्हणून घेत आहोत पण संचारबंदीचे नियम माञ पाळत नाहीत. अनेक सुशिक्षित बुध्दीजीवी महाभाग तसेच हुल्लडबाज तरुण दारात मृत्यू उभा ठाकला असताना सुध्दा सहजपणे घेत असून स्वतः बरोबर दुसर्याचे जीवन नेस्तनाबूत करत आहेत.

देशात कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रातील मुंबई पुण्यात तर परिस्थिती हाताबाहेर गेली कोरोना प्रादुर्भाव मुळे अनेकांचा बळी घेतला आहे.

मुंबई पुणे नाशिक नागपूर मधील अनेक कोरोना बाधीत भाग पूर्णपणे सील केले असून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सध्याचे कोरोना संकट हे महाभयंकर असून दुसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावरच अनेक रुग्नाला मृत्यूने वेढले आहे.

कोरोना पासुन वाचायचे असेल तर फक्त घरी राहणे व कोणाच्याही संपर्कात न जाणे एवढाच उत्तम पर्याय आहे.

आज आपण घरी थांबलो तर कोरोना लढाई सहज जिंकू शकतो शिवाय नंतरचे जीवन निश्चिंतपणे सुखी समाधानी जगू शकतो. अत्यावश्यक वस्तू विकत घेणे ,धान्ये किराणा माल ,गोळ्या ,औषधे ,भाजीपालाफळे या सर्व गोष्टी घरपोच सुध्दा मिळत आहेत . वरील वस्तू घरपोच करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था ,राजकीय पुढारी ,सतर्क व्यापारीवर्ग मदत करताना दिसतो आहे.शिवाय सीमाबंदी राज्यबंदी आदेशामुळे पुणे मुंबईत अडकून पडलेले कामगार ,हातावर पोट असलेले मजूर ,निराधार लोक यांना सरकारने अनेक ठीकाणी निवारा केंद्राची उभारणी केली . त्याच ठीकाणी त्यांना सकाळच्या न्याहरीसह भोजनव्यवस्था कार्यन्वीत केल्यामुळे तो प्रश्न सुटला आहे.

राज्यातील शहरी भागात कोरोना वाढण्यामागे अनेक कारणे आहेत त्यात शासकीय नियमांचे सातत्याने उल्लंघन , औषधे ,जीवनावश्यक वस्तू ,भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडणे, प्रातःकाळी व्यायामाच्या नावाखाली रस्त्यावर व सोसायट्यात पायी घिरट्या मारणे ,धावणे , सोसायट्या त गप्पाटप्पा करणे ,आडबाजूला हुल्लडबाजांकडून पत्त्यांचा डाव खेळणे ,गूपचुप पार्टी करणे आदी बाबी कोरोना प्रादुर्भाव वाढीसाठी खतपाणी घालत आहेत.दुसऱ्या बाजूस मराठवाडा ,विदर्भ ,खाणदेश ,प.महाराष्ट्र काही जिल्हे या भागात कोरोना चा शिरकाव होत आहे तेथे लोकांनी प्रशासनास सहकार्य करत सजग सतर्क होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील एकंदरीतच ग्रामीण भागात परिस्थिती सध्यातरी आटोक्यात आहे . तालुक्यात गावखेड्यात बरेच लोक शेतात राहण्यासाठी गेले असून संपर्क टाळत आहेत.लोकसंख्या कमी असल्यामुळे नियंत्रण सोपे तसेच भाजीपाला धान्ये दूध घरीच उपलब्ध असल्यामुळे धावपळ करण्याची आवश्यकता नाही.बाहेर पडण्याची आवश्यकता नसल्यामुळे संक्रमित होण्याचा दर खूप कमी आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्नालयाने काही फिरती आरोग्य पथके नियुक्त केल्याचा फायदा होत आहे. शेवटी ग्रामीण महाराष्ट्रातील धोका टळला असे होत नाही त्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकजुट ठेवावी लागणार.

शहरी भागातील सामान्यवर्ग युवक ,नोकरदार ,मध्यमवर्गीय ,व्यावसायिक सर्वानी च कोरोना ला पराभूत करण्यासाठी एकवटणे अत्यावश्यक झाले आहे. आपल्या सवयीला काही दिवस मुरड घालणे ,अत्यावश्यक वस्तू ,किराणा,भाजीपाला ,औषधे घरपोच मिळत असल्यामुळे बाहेर जाणे टाळणे. पोलीस प्रशासन,तहसील ,मनपा ,आरोग्य प्रशासन ,सरकार उत्तम कार्य करत आहे त्यांचा आदर करुन पाठींबा देणे. स्वयंसेवी संस्था पदाधिकारी , समाजसेवक,पञकार कामानिमित्त लोकांच्या संपर्कात येत आहेत त्यामुळे यांनी सर्वच बाबतीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे .अशा प्रकारे जर आपण शासकीय नियमांचे योग्य प्रकारे पालन केले स्वतः ला शिस्त लावली सवयीला मुरड घातली घरीच थांबलो तर कोरोना वर विजय प्रस्थापित करु शकतो.

यासाठी घरी रहा सुरक्षित रहा निश्चितपणे जीवन जगा असे सांगावे लागत आहे तर दुसरीकडे

माञ आता घरा बाहेर पडाल तर दारात मृत्यू तुमची वाट पाहतोय

हे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे मिञांनो बाबांनो आता तरी स्वतःला आवरा ही मजाक नाही समोर मृत्यूचे तांडव आहे घरी थांबा…

नितीन जाधव
जनसंपर्क अधिकारी
तथा मंञालय मुख्य संपर्कप्रमुख
महा.राज्य पञकार संघ,मुंबई.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button