sawada

सावद्यात एक नव्हे दोन बायोडिझेल पंप : परवानगी नसताना सर्रास विक्री सुरू

सावद्यात एक नव्हे दोन बायोडिझेल पंप : परवानगी नसताना सर्रास विक्री सुरू

ठळक मुद्दे

शहरातील दुसरे बायोडिझेल पंप बाबत महसूल विभागा अनभिज्ञ की डोळेझाक

कागदपत्र पडताळणीच्या नावाखाली दिलेली उशिरामाफी मुदतवाढ संशयास्पद

महसूल विभागाचा संथपणा चोरांना पाऊलखुणा नष्ट करण्याची संधी

जिल्हाधिकारी जळगांव कडून लक्ष देण्याची गरज

युसूफ शाह सावदा

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील तालुका असलेल्या रावेर येथे अवैधरित्या रॉकेल मिश्रित बायोडिझेलची विक्री व साठवण करणाऱ्यां दोन जणांवर गुन्हा दाखल करून जोड पास साडे तीन लाखाचा साहित्य म्हणून मुद्देमाल जप्त केल्याची धडक कारवाई रोवेर पोलिसांनी केल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे.
तसेच रावेर पोलिसांनी सावदा ते रावेर रस्त्यावर बायोडिझेल वाहतूक करणाऱ्या छोट्या मालवाहू वाहनास थांबवले असता त्यांच्याजवळ रीतसर बायोडिझेलच्या पावत्या आढळून आल्याने यावरून निदर्शनास येते की सावदा येथे बायोडिझेल पंप सर्रासपणे सुरू असल्याची खळबळजनक बाब समोर आल्याचे समजते.

यासंदर्भात पोलिसांनी महसूल प्रशासनास कळवूनही तसेच बायो डिझेल विक्री, पुरवठा किंवा त्याची साठवणूक बाबत कोणालाच परवानगी दिली नसल्याने सदरचा प्रकार आढळून आल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या तरतुदीप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सक्त सूचना देऊनही सावदा येथील बायोडिझेल अवैधरित्या विक्री करणाऱ्या पंप चालकांवर कोणतीही ठोस कारवाई आज पावेतो करण्यात आलेली नाही.

सदरील घटना बद्दल पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक रावेर यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे रावेर यांच्याशी संपर्क साधून बायोडिझेल विक्री करणारे पंप बाबत माहिती दिली असता पुरवठा निरक्षक अतुल नागरगोजे व सावदा मंडळ अधिकारी संदीप जयस्वाल यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. मात्र यांनी बायोडिझेल पंपचालकाला विचारणा केली असता त्यांनी मालक बाहेरगावी असून त्यांनी
अत्यावश्यक कागदपत्र सादर करण्याकरिता मुदतवाढ मागितली. तरी संबंधित पंप मालकाकडून दस्तावेज पाहून सदरील बायोडिझेल पंपाच्या वैधतेची पडताळणी शक्य होईल. असे तहसीलदार रावेर यांनी म्हटल्याचे समझते.

तसेच सदरच्या पंपचालकास कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ देणे एक प्रकारे त्यांना मुबा व संधी देण्यासारखे नाही का? पंप मालकांना कागदपत्र सादर करण्याची दिलेली काल मर्यादा काय? संबंधित वाहनचालकांना सोडून देण्यामागचे कारण काय? सावदा येथे बायोडिझेल पंप दोन असून फक्त एकाच पंपावर चौकशीकामी जाण्या मागचे कारण काय? महसूल व पुरवठा अधिकारी सह वरिष्ठांना सावदा ते फैजपूर रोडावरील डायमंड तोल काट्या च्या मागे गुपित पद्धतीने दुसरे बायोडिझेल पंप चालवला जात असून याची माहिती नाही का? असे यक्ष प्रश्न उपस्थित होत असून याबाबत नागरिकांमध्ये खेद व आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button