आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये रोजंदारी/ तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ प्रवर्गातील ४००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण सुरगाणा विधानसभा चे आमदार नितीन अर्जुन पवार यांनी बैठक आयोजित केली होती.
नाशिक : आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये रोजंदारी/ तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ प्रवर्गातील ४००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण सुरगाणा विधानसभा चे आमदार नितीन अर्जुन पवार यांनी बैठक आयोजित केली होती.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी साहेब, श्री. अनुपकुमार, सचिव आदिवासी विकास, सचिव वित्त विभाग, सचिव सामान्य प्रशासन व मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत कायम करण्याबाबत मा. सुप्रीम कोर्टाने न्याय निवाडा दिला आहे यावर उपमुख्यमंत्री यांनी सदर निर्णयावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या. तसेच जवळ पास १८ वर्षांपासून रोजंदारी तासिका बेसीस वर काम करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आमदार नितीन अर्जुन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे केली.
सध्यस्थितीत राज्यात शासनाच्या विविध विभागांचे ३ लाख पदे रोजंदारी तत्वावर नोकरी करत असुन या सर्वांचा विचार करता धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री यांनी केले. मा.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायनिवड्यानुसार ज्यांची सेवा १० वर्षांपेक्षा जास्त झाली आहे त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी संबंधित विभागास सूचना दिल्या तसेच रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचारी संघटनेचेच्या प्रतिनिंधीनी किमान ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्याकडे मागणी केली असता यावर राज्यशासन सकारात्मक विचार करुन माहे जानेवारी २०२१ मध्ये यावर कार्यवाही करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी यावेळी आमदार पवार यांना दिले. याप्रसंगी रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचारी यांच्या समायोजन विषयाच्या बैठकीसाठी प्रतिनिधीं म्हणून
सचिन शशिकांत वाघ,महेश यशवंत पाटील, रेणुका प्रकाश सोनवणे, रुपाली मधुकर कहाणडोळे, चंद्रकांत काशीराम गावित, संतोष कोमल कापुरे, जब्बार कलिंदर तडवी, संतोष गजानन गावत्रे, संतोष अर्जुन खोटरे, रविंद्र एकनाथजी गणवीर उपस्थित होते.






