Amalner

अमळनेर: मंगळग्रह परिसरात नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळले

मंगळग्रह परिसरात नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळले

अमळनेर येथील श्री मंगळ देव ग्रह मंदिराच्या परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास मंदिरालगत असलेल्या दुकानांच्या पाठीमागे आज जन्मलेले नवजात स्त्री जातीचे बेवारस अर्भक आढळून आले. स्थानिक दुकानदारांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी अर्भकाला तात्काळ उपचारार्थ शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनाही माहिती कळविण्यात आली असून पोलीस कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी अमळनेर शहर बस स्थानक परिसरातील स्वच्छतागृहालगतच्या कचराकुंडीत स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अर्भकाचे कुत्र्यांनी लचके तोडले असल्याने त्याला तत्काळ उपचारार्थ धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. हे अर्भक टाकून देणारी ती महिला चांदणीकुर्‍हे येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. माताच वैरिणी असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने अमळनेरकर सुन्न झालेले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button