Faijpur

नुतन पोलीस अधिक्षक मा प्रविण मुंढे यांनी फैजपूर पोलिस स्टेशनला भेट

नुतन पोलीस अधिक्षक मा प्रविण मुंढे यांनी फैजपूर पोलिस स्टेशनला भेट

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

जळगांव जिल्हा पोलीस दलाचा पोलीस अधिक्षक म्हणुन कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला सरप्राईज व्हिजीट देत असुन फैजपुर पोलीस स्टेशनला दुपारी 13.00 वाजेच्या सुमारास भेट दिली. भेटीदरम्यान मा.पोलीस अधिक्षक जळगांव यांनी पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणाली चा आढावा घेतला तसेच कर्मचारांचे शासकीय निवासस्थान,पोलीस स्टेशनची प्रशासकीय इमारत याबाबत माहीती घेवुन जिर्णनिवासस्थाने तसेच पोलीस स्टेशनचे प्रस्थापित (आरक्षित जागे संदर्भात माहीती जाणुन घेतली.तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारांचा दरबार घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्या जाणीव घेतल्या तसेच पोलीस कर्मचारांनी व अधिकारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले कार्य प्रामणिक पणे व पारदर्शी पणे पार पाडावे जेणेकरुन पोलीसांबद्दल जनमानसात पोलीसांची प्रतिमा उच्चावेल. पोलीस स्टेशनला आलेल्या प्रत्येक तक्रारदारांचे समस्या समजवुन घेऊन कायद्याच्या चौकटीत राहुन आपण त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामणिक प्रयत्न करावा असा मोलाचा सल्ला दिला असुन गुन्हेगारांवर योग्य तो कायद्याचा वचक ठेवण्यासाठी पोलीस हा कोठेही कमी पडणार नाही या दृष्टीने त्यांच्यावर वेळोवेळी योग्य ती कार्यवाही करुन तसे त्यांचे अभिलेख अद्यावत ठेवावे.पोलीसांनी अवैधधंद्यांवर वेळोवेळी प्रभावी कार्यवाही करावी. तसेच पोलीस कर्मचारांना काहीही अडचणअगर समस्या असल्यास त्यांनी समाधान हेल्पलाईन चा वापर करुन त्यांच्य अडचणी मांडाव्यात असे योग्य मार्गदर्शन केले आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button