Nashik

नेहरू युवा केंद्र संगठन महाराष्ट्र व गोवा राज्याचे उपनिदेशक पदी पदोन्नती. नाशिक ला दुसर्यांदां यशवंत मानखेङकर यांची नियुक्ती.

नेहरू युवा केंद्र संगठन महाराष्ट्र व गोवा राज्याचे उपनिदेशक पदी पदोन्नती. नाशिक ला दुसर्यांदां यशवंत मानखेङकर यांची नियुक्ती.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : नेहरू युवा केन्द्रं संघटन कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या दिल्ली मुख्यालयामार्फत नुकतेच दिनांक ३१/०५/२०२१ रोजी आदेशान्वये ९० जिल्हा युवा अधिकारी हयांचे पदोन्नतीने उपसंचालक पदावर वर्णी लागली असून महाराष्ट्रातून मुंबई उपनगरच्या जिल्हा युवा अधिकारी डॉ. कविता श्रीवास्ताव, पुणे जिल्हयाचे यशवंत प्रभु मानखेडकर अहमदनगनर जिल्हयाचे शिवाजी खरात तर गोवाचे श्री कालीदास घाटवळ हयांचा समावेश आहे. नेहरू युवा केंद्र संघटन नाशिक ला यशवंत मानखेडकर सर हयांनी दोनदा जिल्हा युवा अधिकारी होण्याचा मान मिळवला असून जिल्हा प्रशाासनाच्या बरोबर त्यांनी विविध कार्य केलेली आहे. आदीवासी प्रकल्प विभागासमवेत समन्वय करुन नेहरु युवा केंद्र संघटन तसेच आदीवासी भागात त्यांनी पोहचविले. तसेच बालकामगार प्रकल्प व इतर ही योजना त्यांनी आणल्या. नेहरु युवा केद्र नाशिक वतीने सर्व नवनियुक्त उपनिदेशक हयांचे दिलीप आहेर लेखा व कार्यक्रम सहायक श्री सुनिल पंजे, डॉ .राजेश साळुंके, संतोष वाळवंटे ,मालेगांव संजय वाघ, विनोद राऊत वर्धा चे लेखा व कार्यक्रम सहायक श्री दयाराम रामटेके आदीनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button