Nashik

Election Live: राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांची हॅट्रिक..चौथ्यांदा गाठली विधानसभा

राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांची हॅट्रिक..चौथ्यांदा गाठली विधानसभा

नासिक प्रतिनिधी सुंनिल घुमरे

दिंडोरीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांची हॅट्रिक..चौथ्यांदा गाठली विधानसभा तुतारीची लाट ओसरली विधानसभा उपाध्यक्ष पराभूतची परंपरा खंडित दिंडोरी पेठ मतदार संघात महाविकास आघाडीच्या सुनीता चारोस्कर यांचा 44532 मतांनी पराभव करत महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी 138442 मते घेत सलग तिसऱ्यांदा विजय संपादन करीत राष्ट्रवादीचा गड राखत आपला बालेकिल्ला चौथ्यांदा काबीज केला. या निवडणुकीत जातीय समीकरनावर निकाल ठरण्याची चर्चा मतदारांनी झुगारून लावत जातीयवादाला थारा दिला नसल्याचे स्पष्ट झाले, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी मतदारसंघात गेल्यावेळी सरळ लढतीत राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार नरहरी झिरवाळ यांनी 60542 मतांनी विजयी होत शिवसेनेचे भास्कर गावित यांना पराभूत केले होते. राष्ट्रवादी तिल फुटीनंतर झिरवाळ यांनी अजित दादा पवार यांच्यासोबत राहणे पसंत करत निवडणूकही अजित दादा पवार यांचेकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय योग्य ठरला आहे. पेठ या त्यांच्या बालेकिल्ल्यात अपेक्षित मताधिक्य मिळाले नसले तरी दिंडोरी तालुक्याचे पूर्व भागात मात्र अपेक्षा पेक्षाही जास्त मते मिळाल्याने विजय सुकर होत मताधिक्य वाढले. सामान्य नेता म्हणून ना झिरवाळ यांना सहज विजय संपादन मिळवण्यासाठी धढपढ झाली

दिंडोरी येथील मविप्र संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु होवून 32 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. नरहरी झिरवाळ यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत ती आघाडी कायम ठेवत विजय संपादन केला. झिरवाळ यांना दिंडोरी तालुक्यात अहीवंतवाडी, वणी, कोचारगाव, खेडगाव, मोहाडी, उमराळे गटात आघाडी घेतली, तर पेठ तालुक्यानेही झिरवाळ यांनाच साथ दिली. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ सतराव्या फेरीपर्यंत आघाडीवर राहत त्यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट होत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. तर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निकालाचा अंदाज येताच तिथून काढता पाय घेतला. निवडणुकीत जातीय समीकरणं झुगारून विकास व जनतेत राहून आपली सर्वसामान्य प्रतिमा जपनारे म्हणून मतदारांनी मतदान केले. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी कॉंग्रेस सह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात प्रचंड घोषणाबाजी सुरु केली. “ नरहरी झिरवाळ आगे बढो हम तुम्हारे साथ है|”, “ एकच वादा अजित दादा” “जय श्रीराम|” अशा घोषणा देत झेंडे फडकावले. तसेच निकालाच्या ठिकाणी नरहरी झिरवाळ यांचे आगमन होताच सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत झिरवाळ यांना सर्वांनी उचलून घेत आनंदातिशयाने नाचत सुटले गुलालाची उधळण करीत तिथूनच मिरवणुकीस सुरुवात झाली. यानंतर झिरवाळ यांनी मतमोजणी केंद्रात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते नरहरी झिरवाळ यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यानंतर सर्व कार्यकर्ते सह झिरवाळ यांची मिरवणूक दिंडोरी येत विजयी सभा संपन्न झाली. पाठिंबा देऊनही वाजली पिपाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांची तुतारी व अपक्ष उमेदवार सुशीला चारोस्कर यांची पिपाणी निशाणी होती, सुशीला चारोस्कर यांनी सुनीता चारोस्कर यांना पाठिंबा दिला होता, तरीही नाव व निशाणी साधर्म्य ची लोकसभेची पुनरावृत्ती होत पुन्हा पिपाणीला 9694 मते मिळाली, बसपा उमेदवार पेक्षा नोटाचे मतदान जास्त तालुक्यात बसपाच्या उमेदवार गोरख गोतरने यांना 1035मते तर त्यांच्या पेक्षा नोटा हे बटन दाबून 1657 मतदान झाले, अपक्ष उमेदवार संतोष रेहरे यांना 4311 मतांवर समाधान मानावे लागले, तर बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार योगेश भुसार यांना 3605 मते मिळाली, कोट ;- नरहरी झिरवाळ ( आमदार दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघ ) मागील तीन पंचवार्षिक निवडून आल्यावर जनसेवेचे काम अखंड सुरु ठेवले त्यामुळेच जनतेने मला माझ्या कामावर विश्वास ठेवत प्रचंड मताधिक्याने निवडून दिले.विरोधकांनी माझ्याबाबत अपप्रचार केला जातीयवाद पसरवला मी मराठा विरोधी असल्याचा अपप्रचार केला मात्र मराठा बांधवांनी माझ्यावरील विश्वास कायम ठेवला. जनतेच्या या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ न देता तळागाळातील जनतेचे व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास मी प्राधान्य देईन व रखडलेली विकास कामे शीघ्रतेने मार्गी लावील व माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचे मी सोनेच करीन असे सांगितले, दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघ निकाल एकूण झालेले मतदान 256905 1) गोरख गोतरने (बसपा)- 1037 2) सुनीता चारोस्कर (महाविकास आघाडी) 93910 3)नरहरी झिरवाळ (महायुती) 138442 4) सुशीला चारोस्कर (अपक्ष)- 9694 5)संतोष रेहरे ( अपक्ष )- 4311 6)नोटा- 1657 महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नरहरी झिरवाळ हे 44532 मतांनी विजयी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button