sawada

सावदा शहरातील हद्द वाढीव भागातील गरीकांना, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी

सावदा शहरातील हद्द वाढीव भागातील गरीकांना, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

येथील शहरात शहर हद्द वाढीत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन वसाहतीतील नागरिकांना साधारण दुप्पटीने आकारणी केलेली पाणी पट्टी कर कमी करून त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांच्यासह सात नगरसेवकांनी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सावदा शहराभोवती गेल्या कित्तेक वर्षापासून उसने नागरिकत्व उपभोगताना चारही बाजूंनी वसलेल्या नवीन वसाहतींना शहरातील नागरीकांपेक्षा दुप्पटीने सर्व साधारण कर भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र गेल्या वर्षापुर्वी शासनाने शहर हद्दवाढीला अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे येथील नवीन वसाहतील नागरिकांना सर्व साधारण पाणी पट्टीचा कर आता कमी करून नियमित शहरवासियांप्रमाणे लागू करण्यात यावा. अर्थात पुर्वीच्या दुपटीने आकारण्यात येणार्‍या साधारण पाणी पट्टी करात कपात करण्यात यावी.

तसेच यापूर्वी हद्दी बाहेर नवीन नळ कनेक्शन मिळणे साठी अवास्तव डिमांड नोट देऊन हकनाक भुर्दंड सहन करावा लागला होता तोही कमी करण्यात यावा. आताही जुन्या प्रमाणात डिमांड नोट आकारणी केली जात असून, तसे न करता नियमित शहर वासियांप्रमाणे डिमांड नोट आकारणी करून त्यांना दिलासा दिला जावा. निवेदनात असेही त्यांनी नमूद केले आहे की हद्द वाढीव भागातून सांडपाणी वाहून जाणे करीता गटारी नाहीत. यामुळे तेथील भागात पावसाचे पाणी वाहून जात नाही. सर्व दुर पाणीच पाणी साचले जाते हेच पाणी अनेकदा रहिवाच्या घरात घुसल्याने नुकसान होत आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना जा ये करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहात नाही. पाणी निथळून गेल्यावर सर्व दुर गारा-चिखल होत असल्याने जा ये करता येत नाही. परिणामी नागरी सुविधा नसल्याने येथील रहिवाशांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवीन हद्दीतील भागात रस्त्यांवर गीट्टी मुरूम टाकून तेथील रहिवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवकांनी लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात विरोधी गट नेते फिरोजखान पठाण, राजेश वानखेडे, सिध्दार्थ बडगे,
किशोर बेंडाळे, नगरसेविका विजया जावळे, मिनाक्षी कोल्हे, नाजेरा बागवान, यांच्या साक्षरी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button