Maharashtra

CIBIL स्कोर कमी असलेल्याना पण कर्ज द्यावे, न देण्याऱ्या बँकावर कठोर कारवाई करावी नॅशनल सोशालिस्ट पार्टी

CIBIL स्कोर कमी असलेल्याना पण कर्ज द्यावे, न देण्याऱ्या बँकावर कठोर कारवाई करावी नॅशनल सोशालिस्ट पार्टी

प्रतिनिधी दीपक कांबळे

सर्व सामान्य जनतेला **CIBIL*च्या गोंडस नावाखाली कर्जे नाकारणाऱ्या बँकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नॅशनल सोशालिस्ट पार्टी संलग्न माहिती अधिकार आणि* *पत्रकार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.मा. श्री.दिपक कांबळे यांनी मुख्यमंत्री मा.श्री. उध्दव ठाकरे यांच्याकडे केली* *आहे*
सध्या संपूर्ण देश आणि महाराष्ट्र कोरोना सारख्या संकटाला सामोरे जात आहे.महाराष्ट्राची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.बँकाना रिझर्व्ह बँकेने आदेश देऊन पण हफ्ते वसुली जोरात चालू आहे.लोकांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पण पैसे नाहीत.सरकारकडून काही आर्थिक मदत मिळाली नाही. रेशनिग मिळून काय फायदा?बाकीच्या वस्तू घेण्यासाठी पैसे कुठे आहेत.लोकांना अजून 3 महिने पगार नाही,व्यापारी वर्गाला 3 महिने 1 रु पण धंदा नाही आणि आता लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाली तर त्यांना माल आणायला पण भांडवल नाही.आर्थिक गरज भागवण्यासाठी नाइलाजाने खाजगी सावकाराकडे जावे लागते.खाजगी सावकार भरमसाठ व्याज घेतात त्यामुळे सर्व सामान्य लोकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.बँकेत कर्ज मागायला गेले तर बँका टाळाटाळ करतात.राज्यातील ८०% जनतेचे आर्थिक अडचणी मुळे CIBIL रेकॉर्ड खराब झाले आहे.२ ते ३ हफ्ते थकले तर लगेच बँका ते CIBIL रेकॉर्डला दाखवतात.पण तेच श्रीमंत लोक कर्ज घेणार असतील तर बँका सर्वकाही मॅनेज करतात.मात्र गरिबांना हाकलून देतात.रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीत असे कुठे लिहले आहे की कर्ज फक्त मोठया आणि श्रीमंत वर्गालाच द्यावे.विजय मल्ल्या, वाधवन बंधू, निरव मोदी ,मेहुल चोक्सी यांच्या सारख्या कर्जबुडव्या आणि चोर लोकांना कर्ज देताना बॅंका CIBIL चे नियम धाब्यावर बसवतात कारण त्याना त्यांच्या कडून मलई मिळते ना खायला. मग सर्व सामान्य लोकांनी काय करायचे?कुठून मलई द्यायची मग त्यांना असे थातूर माथूर कारण देऊन हकालयचे. बँकांनी पण सर्व सामान्य लोकांना जास्त त्रास न देता कर्ज दयावे.सामान्य माणूस हा कधीच कर्ज बडवत नाही,बुडावतात ते मोठे लोक.
बँकांनी सर्व सामान्य जनतेला पण त्रास न देता कर्ज द्यावे अशी तमाम महाराष्ट्रातील लोकांनी मागणी व विनंती नॅशनल सोशालिस्ट पार्टी कडे केली. त्या मागणीला आणि विनंतीला मूर्त स्वरूप देऊन त्या बँकाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम नेहमीच नॅशनल सोशालिस्ट पार्टीने केले आहे.याप्रकरणी योग्य ती कारवाई करून सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची मागणी नॅशनल सोशालिस्ट पार्टी ने मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे साहेब यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button