Rawer

नाशिक उत्पादन शुल्क पथक जिल्ह्यात भरारी कारवाई न करताच माघारी?

नाशिक उत्पादन शुल्क पथक जिल्ह्यात भरारी कारवाई न करताच माघारी?

जळगांव जिल्ह्यात तीन दिवस पुर्वीपासून उत्पादन शुल्क नाशिक पथकाची दाखल झाले आहे मात्र काही एक कारवाई न करता फक्त नावालाच केली का भुसावळ विभागात अबकारीने वारी ?

रावेर प्रतिनिधी /मुबारक तडवी

जळगांव जिल्ह्यात तीन दिवस दरम्यान महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक भरारी पथक दाखल झाले होते मात्र कुठे? कोणावर? काय? कारवाई केली हे अद्यापही गुलदस्त्यातच ? असल्याची चर्चा जिल्हाभरात चर्चेत आहे गेल्या ३ दिवसापूर्वी नाशिक येथील उत्पादन शुल्क विभाग जळगाव जिल्ह्यातील भुसावळ अखत्यारीत भागात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथक चौकशीसाठी दाखल झाले होते. त्यांनी जिल्ह्यात कुठे कुठे व कोणते वाईन शॉप बियरबार तपासणी केली? व कशी? कोणावर? काय कारवाई केली? ही कारवाई अधांतरीच असून अद्यापही गुलदस्त्यातच दडलेली दिसत असल्याची शंका निर्माण झाली आहे, याबाबत जिल्ह्याभरातील देशी विदेशी, वाईन शॉप, परमिट रूम बियर बार चालक,मालकांसह भुसावळ व यावर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी संभ्रमात पडले आहेत व नाशिक भरारी पथकाने कोठे? व कोणावर? काय कारवाई केली याचा शोध घेत असल्याचे प्रशासन तपास करीत असल्याचे समजते?
उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी यांनी जिल्ह्यातील भुसावळ विभागात तीन दिवस पुर्वीपासून जळगांव जिल्ह्यातील भुसावळ मुक्ताईनगर यावल रावेर तालुक्यातील अनेक ठिकाणी परमिट रूम बियरबार वाईन शॉपींची तपासणी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे दरम्यान नियमभंग करणार्या अनेक परवानाधारक परमिट रूम बियरबार वाईन शॉप मालकांना कारवाई करण्याचे दबावतंत्राचा वापर करून लाखोंची माया? संबंधित दुकानदारांकडून या भरारी पथकाने उकडल्याचे बोलले जात आहे? पण नाशिक भरारी पथक जळगांव जिल्ह्यात दाखल तर झाले मात्र पथकाने कोठे काय कारवाई केली हे नक्की अद्यापही नजरेस न पडलेले आहे व काय कारवाई केली हेही अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button