नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसाच्या पंचनाम्याची दिंडोरीच्या खासदार व विधानसभा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सुरू शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न…
सुनील घुमरे
दिंडोरी तालुक्यात काल दिनांक 13 5 2020 रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह गारपीट झाल्याने गारपीट झाल्याने आपण महाराष्ट्रात किंवा नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात की जम्मू-काश्मीरमध्ये आहोत अशा प्रकारचे चित्र या परिसरात उमराळे बघण्यास मिळाले तर नाळेगाव पांडाणे लखमापूर पाऊस व वादळ या परिसरात अचानक आलेले या संकटाने आधीच जगभरात महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातही तालुक्यातही कोरोना विषाणू मुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच काल शेतात असलेल्या कांदा द्राक्ष फ्लावर कोबी कारले आदींचे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले यावेळी वरिष्ठ पातळीवरून हालचाल होऊन तालुक्यात मा प्रांताधिकारी संदीप आहेर यांनी तात्काळ याठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत संबंधित कृषी विभाग व महसूल यंत्रणेला सांगितले आज सकाळी दिनांक 14 5 2020 रोजी प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याकरता प्रसंगी दिंडोरी लोकसभेच्या खासदार सौ भारती ताई पवार या उमराळे येथे तर उमराळे ,नाळेगाव, सर्व परिसर येथील गारपीट नुकसान पाहणी करताना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार श्रीनरहरी झिरवाळ यांचेसह तहसीलदार श्री कैलास पवार तालुका कृषी अधिकारी श्री अभिजीत जमदाडे तसेच या परिसरातील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक व नुकसानग्रस्त शेतकरी याठिकाणी उपस्थित होते अंदाजे नऊ गावांच्या परिसरात 610 शेतकऱ्यांचे अंदाजे281 हेक्टरवरील नुकसानीचे असण्याची शक्यता कारण आज पूर्व भागातही पाऊस व वादळ झालेअसून पंचनामे आज सुरु झाले असून यात भाजीपाला 80 हेक्टर व द्राक्ष 110 हेक्टर चे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पंचनामे सुरू असून पंचनामे चा आकडा अजूनही वाढण्याची दाट शक्यता आहे. संबंधित यंत्रणा उर्वरित पंचनामे करण्याचे काम आज व ऊद्या करणार आहेत मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा काढून घेतल्याने शेतकरी पुन्हा हवाल दिल झाला आहे व आता यातून सावरण्यासाठी चांगल्या प्रकारची काहीतरी पॅकेज मिळावे अशी दिंडोरी तालुक्या ती ल सह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा राज्य व केंद्र सरकारकडून असून याबाबत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे या कोरोना विषाणूच्या काळात फक्त शेतकरीच व इतर प्रशासकीय यंत्रणेसोबत आपल्या शेतातील भाजीपाला शेतकऱ्यांनी गावा गावातून जनतेपर्यंत पोचवत असून मात्र मोठे उद्योग असतानाही ते बंद झालेले असून शेतकरी मात्र रात्रंदिवस आजही शेतात राबत असून अशा प्रकारच्या निसर्ग हानित शासनाकडून त्याला मदत व्हावी व ती होईल या अपेक्षेवर धीर धरून आहे






