नंदुरबार – विविध स्पर्धांनी गाजणार सारंगखेडा च्या अश्व बाजार, यात्रेसाठी अश्व येण्यास सुरुवात….
नंदूरबार:- शेख फहीम मोहम्मद
घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याच्या यात्रेला अजून आठ ते दहा दिवसाच्या अवकाश असला तरी आतापासूनच यात्रेत घोडे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. एक मुखी दत्तमंदिर असलेल्या सारंगखेडा येथील यात्रा ही एक ऐतिहासिक यात्रा असून घोडेबाजारासाठी ही यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ही यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून नागरिक येथे येतात सारंगखेडाची यात्रेला 14 डिसेंबर पासून सुरुवात होणार असून 29 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या यात्रेत चेतक फेस्टिवल च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आयोजक जयपाल सिंग रावल यांनी दिली. सारंगखेड्याच्या यात्रेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने अश्व दाखल होतात यावर्षीही जवळपास अडीच ते तीन हजार उच्च प्रजातीचे अश्व दाखल होणार आहेत.यावेळी भारतातील सर्वात उंच असलेला भारतीय प्रजातीच्या अश्व पंजाब मधून यात्रेत दाखल होणार आहे. चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून यात्रेत अश्वाच्या अनेक स्पर्धा भरवल्या जातात यावेळेस देखील अश्वसौदर्य स्पर्धा, रेवाल स्पर्धा ,अश्व क्रीडा,अश्व नृत्य स्पर्धा सोबत पंजा कुस्ती स्पर्ध चे देखील आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हिटमॅन प्रीमियर रायडिंग स्पर्धाचे देखील आयोजन येथे करण्यात आले आहे यामध्ये विविध शाळेमधील जवळपास 200 विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे .सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी येथे होत असते त्यामुळे तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.यात्रेला अवकाश असला तरी अश्व दाखल होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती आयोजक जयपाल सिंग रावल यांनी दिली…






