मुंबईचा विजयी पंच;ह्या गोष्टीं मुळे विजयश्री शक्य…
ह्या 5 गोष्टींमुळे विजय मिळवला…
मुंबई इंडियन्सची नेहमी प्रमाणे सर्वच बाबतीत उत्तम कामगिरी केली आहे. सलग पाचव्या वेळेस मुंबई इंडियन्स ने आय पी एल मध्ये विजय मिळवला आहे.ही आहेय 5 कारणे ज्या मुळे मुंबई इंडियन्स विजयी ठरू शकले…
1.कमी धावसंख्या : मुंबईच्या विजयामागील सर्वात पहिलं कारण म्हणजे दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांना आलेले यश. मुंबईची तगडी फलंदाजी पाहता त्यांच्यासाठी धाव संख्या चे अत्यन्त आव्हान कमी होते.
2. पॉवरप्लेचा फायदा : मुंबई विजयी होण्यामागील दुसरं प्रमुख कारण म्हणजे पहिल्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी दमदार सुरुवात केली. यामुळे अंतिम षटकांमध्ये त्यांच्यावर फारसा दबाव राहिला नाही.
3. आघाडीची फळी दमदार: मुंबईच्या पहिल्या फळीतील फलंदाज रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन यांनी दमदार खेळी केली. त्याचा फायदा संघाला झाला.
4. गोलंदाजांवर दबाव : मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवाती पासूनच दिल्लीच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला होता त्यामुळे धाव संख्या कमी झाली परंतु तसा दबाव निर्माण करण्यात दिल्लीचे गोलंदाज कमी पडले.
5. अनुभवी खेळाडू : मुंबईकडे जवळपास सर्वच अनुभवी खेळाडू आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याचा फायदा संघाला झाला.
काही महत्वाच्या निर्णायक बाबी…
दिल्लीने नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजी घेतली.
पहिल्याच चेंडूवर एक पहिली विकेट पडली.
सुरुवातीची 9 षटके मुंबई वर्चस्व राखण्यात यशस्वी.
मोठी धाव संख्या उभारण्यात दिल्ली ला अपयश .
मुंबईच्या सलामीवीरांची दमदार सुरूवात.
पॉवर प्ले चा उत्कृष्ट उपयोग.
दमदार खेळीनंतर रोहित शर्मा झेलबाद; सामन्यात रंगत निर्माण.
ईशान किशनने 19 चेडूंत नाबाद 33 धावा करत विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
मुंबईने 5 गडी राखून सहज विजय मिळवत पाचवे IPL विजेतेपदावर आपले नाव कोरले.






