Mumbai

Mumbai Diary: Politics:Bachhu Kadu arrest:माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!काय आहे प्रकरण..?

Mumbai Diary: Politics:Bachhu Kadu arrest:माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!काय आहे प्रकरण..?

Mumbai: शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

आमदार बच्चू कडू यांना गिरगांव कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते. बच्चू कडू यांच्याविरुद्ध राजकीय आंदोलन केल्या प्रकरणी दाखल केलेल्या निषेधाच्या गुन्ह्यात गिरगाव न्यायालयात हजर झाले होते. त्यांचा जामीन फेटाळण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्यात आदेश देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?
२०१८ सालच्या एका राजकीय आंदोलनादरम्यान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सरकारी अधिकारी संघटनेने दिला होता.

दरम्यान, आपण संबंधित अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, सरकारी अधिकारी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याने मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने अलीकडेच बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला. त्यानंतर बच्चू कडू आज न्यायालयात हजर झाले, त्यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button