Mumbai

Mumbai Diary: Dasara Melawa: दसरा मेळावा कोण घेणार..?शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया..!

Mumbai Diary: Dasara Melawa: दसरा मेळावा कोण घेणार..?शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया..!

एकीकडे शिवसेना नेमकी कुणाची हा सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला असताना, दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यापासून एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय. आता या वादावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंढरपुरात पत्रकारपरिषद घेतली. यावेळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दसरा मेळावा घेणाचा अधिकार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेनं त्यांना बीकेसीचं मैदान दिलं आहे. मात्र, शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच… असं स्पष्ट मत पवारांनी मांडलं आहे.

दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यात येतो. यावर्षी शिवसेनेत गट पडल्याने दसरा मेळाव्याबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचीच मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

याबाबत शरद पवारांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. ‘एकनाथ शिंदेंनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे. मात्र शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी मांडलेल्या स्पष्ट मतानंतर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेच दसरा मेळावा घेतील का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष पेटणार?

दसरा मेळाव्याबाबत सध्या महापालिकेकडे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाचे अर्ज शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्या संदर्भात आले आहेत. पहिला अर्ज शिवसेनेचा आला आहे त्यामुळे शिवसेनेलाच दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. पण मुंबई महापालिका हे प्रकरण ताणून निर्णय घेण्यास उशीर लावत असेल तर दसऱ्याच्या दिवशी थेट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button