Mumbai Diary: मोठ्या उद्योगपतीने अभिनेत्री वर केला बलात्कार.. गुन्हा दाखल…
मुंबईत एका अभिनेत्रीवर बड्या उद्योगपतीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी उद्योगपतीने लग्नाचं आमिष दाखवून पीडित अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी उद्योगपतीने पीडितेला लग्नाचं आमिष दिलं होतं. त्यानंतर त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी उद्योगपतीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर अनेकदा बलात्कार केला, असा आरोपी पीडितेनं तक्रारीत केला आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.






