Faijpur

मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिस वेल्फेअर तर्फे फैजपूर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण संपन्न

मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिस वेल्फेअर तर्फे फैजपूर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी : सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : सामाजिक संघटना मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिस वेल्फेअर चे कार्यकर्ता प्रशिक्षण मस्जीद ए इब्राहिम हॉल मिल्लत नगर, फैजपूर येथे संपन्न झाले.यावेळी कोरोना संदर्भात आरोग्य सेवा, महिलांच्या विविध समस्या, रेशनकार्ड धारकांच्या समस्या, शैक्षणिक, बांधकाम कामगार इ.विषयांवर चर्चासत्र पार पडले.संघटनेतर्फे १६ ते ३१ नोव्हेंबर काळात संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष आरीफ देशमुख यांनी संघटनेचे कार्य व आगामी काळात एमपीजे संघटनेतर्फे राबविण्यात येणारे उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष मेहमूद खान, अहमद शेख यांनी देखील मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेमुद खान,जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद भाई, जिल्हा सचिव डॉ.मुदस्सर, सल्लागार आर बी चौधरी, शेख फिरोज रावेर,मोइन सर,मौलाना फारुक शाह फैजपूर शहर अध्यक्ष, इक्बाल खान,असदुल्ला सर,मुदस्सर सर,मुस्तकीम सर,रहिमोद्दिन सर यांच्यासह सर्व एमपिजे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button