आई सुशिक्षित तर पुढील पिढ्यांच्या जिवन व भविष उज्वल:एम.डी.डॉ.रौशन जहाँ मुंबई!
“कार्यक्रम दरम्यान विशेष दिल्लीहून तयार करून आणलेली ट्रॉफी देऊन फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख शकील सह उपस्थित मान्यवरांकडून डॉ.रौशन जहाँ यांना सन्मानित करण्यात आले.तसेच याप्रसंगी शिक्षक अय्युब खान दलमीर खान यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन युसूफ शाह,तन्वीर पाटील,फरीद शेख,दिलीप चांदेलकर,शकील भाई करजोत,साजीद उर्फ मटा इत्यादी पत्रकार बांधवांकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
—————————————-
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे आज दि.२६ जुन २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अलकवि एज्युकेशन सोसायटी, सावदा व रौशन जहाँ शेख फाऊंडेशन तांदलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील विद्यार्थ्यांच्या कॅरियर गार्डन साठी जाफर लॉन्स मध्ये एका कार्यक्रम घेवून इतिहासिक पाऊल सावदा येथील ॲंग्लो उर्दू शाळेचे शिक्षक तथा अलकवि संस्थाचे सचिव व रौशन जहाँ फाउंडेशन तांदलवाळीचे अध्यक्ष शेख शकील यांनी उचललं.या कौतुकास्पद कार्यक्रमात एमडी डॉ.रौशन जहाँ शेख यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांची पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमात संख्याने उपस्थित शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षण आयुष्यात किती अनमोल व महत्वाचा असते यासाठी परिस्थितीशी खचून न जाता सर्वप्रथम ईश्वरावर विश्वास ठेवून जिद्दीने शिक्षण प्राप्त करण्याकामी पुढील वाटचाल प्रत्येकाने करावी.जेणेकरून आपल्यासह समाज,शहर,राज्य व देशाची उन्नती होईल हा विचार मनात ठेवून शिक्षणाचे एवरेस्ट शिखर गाठल्याशिवाय गप्प बसता कामा नये.असे आव्हान वजा मार्गदर्शन याप्रसंगी मुंबई येथील सुप्रसिध्द एम.डी.डॉ.रौशन जहाँ यांनी केले.
यानंतर घरची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत तसेच रेल्वे अपघातातील आपले दोन्ही पाय गमविलेल्या व विकलांग असून नसल्यासारखे स्वतःला सिद्ध करून एका सबजी विक्रेताची मुलगी रौशन जहाँ यांनी एम.डी. डॉक्टर होण्यासाठी जे जिद्द व संघर्ष केले हे संपूर्ण देशाला माध्यमांच्या द्वारे कडून चुकलेला आहे.ती ८९% विकलांग असल्याने मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश नाकारले होते.त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन ही लढाई कशी जिंकली.एम.डी डॉक्टर होण्याकरिता त्यांनी कसे संघर्षमय शिक्षण प्राप्त केले. त्यांची ही स्वकथा आयकून सर्व उपस्थित भावूक झाले होते. यासाठी त्यांची आई,भाऊ,वडील इत्यादीने त्यांना कसे समर्थन पाठबळ दिले.शिक्षण आयुष्यात किती महत्त्व ठेवतो.तरी पालकांनी आपले मुला-मुलींना सुशिक्षित करण्यासाठी मेहनत घ्यावी.तसेच मुलांनी देखील आई-वडिलांचा मान सन्मान व आदर सुद्धा करावे.तसेच घरातील आई सुशिक्षित असणे फार महत्वाचे आहे.तरी आई वडीलाचे स्थान काय आहे याबाबत त्यांनी धार्मिक दाखले देवून शिक्षण काळजीने व जिद्दीने घ्यावे यासाठी उपस्थित विद्यार्थी मुला-मुलींना त्यांनी प्रोत्साहित केले.यानंतर जिल्ह्याचे शिक्षण सम्राट व कार्यक्रम अध्यक्ष अब्दुल करीम सालार,सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक हाजी हारून शेठ, एजाज गफ्फार मलिक जळगांव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी कृषी.उ.बा.स. समिती सदस्य सैय्यद असगर,माजी नगरसेवक फिरोज खान पठाण,इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष हाजी अकबर व उपाध्यक्ष सलीम खान,अपेक्स चिल्ड्रन हॉस्पिटल डॉ.शोहेब खान, खान,मोठा वाघोदा येथील माजी ग्रामपंचायत सरपंच कालू मिस्त्री, चीनावल येथील समाज सेवक इरफान सेठ,सरफराज तडवी पुणे,मुस्लिम पंच क.तांदलवाडी अध्यक्ष शेख गयास इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाच्या शेवटी,१० वी १२ वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांना डॉ.रौशन जहाँ यांच्या हस्ते ट्रॉफ्या देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्तफा आबादी यांनी केले तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सैय्यद अकील,मुख्याध्यापक जफर खान,सादीक सर,असद सर व रौशन जहाँ फाऊंडेशनचे सदस्यांनी मेहनत घेतली आहे.






