Nashik

सकाळ”चे पत्रकार दीपक खैरनार यांना मराठी पत्रकार परिषद, मुंबई व नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने मिळाला न्याय…!

“सकाळ”चे पत्रकार दीपक खैरनार यांना मराठी पत्रकार परिषद, मुंबई व नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने मिळाला न्याय…!

सुनिल घुमरे नाशिक

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; सरपंचासह तिघांना अटक.!

*”अंबासन गावात अनियमित पाणीपुरवठा”*..

या मथळ्याखाली दैनिक “सकाळ”मधे बातमी प्रसिध्द केल्याचा राग आल्याने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अंबासन येथील सरपंच व त्याच्या दोघा भावांनी पत्रकार दीपक खैरनार यांचेवर शक्रवारी रात्री साडेआठ वाजता प्राणघातक हल्लाकरुन जिवेमारण्याचा प्रकार घडला.

घटनेची माहिती मिळताच मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार व प्रभारी जिल्हाध्यक्ष कल्याणराव आवटे यांनी तातडीने दखल घेत बागलाण तालुक्यातील जिल्हा संघाचे संघटक काशिनाथ हांडे,पदाधिकारी रमेश देसले यांना घटनास्थळी मदतीसाठी रवाना करत Dy.sp शिंदे व जायखेडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक पांढरे यांचेशी दुरध्वणीवर संपर्क साधत घटनेचे गांभिर्य लक्षात आणून देत हल्लेखोरांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांचेवर ” पत्रकार संरक्षण कायद्यांतप्गत”गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

परिषद व जिल्हा संघाच्या रेट्यामुळे अखेर संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल

संघटनेचा सातत्याने होणारा पाठपुरावा बघता अखेर जायखेडा येथील निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी लागलीच फिर्याद घेत सरपंच जितेंद्र श्रावण अहिरे व इतर दोघे अशा तिघांना १५ ला मध्यरात्री ताब्यात घेतले दि.१६ ला पहाटे पाच वाजता भारतीय दंड विधान कलम 323,504,506,34 सह पत्रकार हल्ला प्रतिबंध कायदा अधिनियम 2019 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला.

कलम 5 नुसार पोलिस उपअधिक्षक शिंदे साहेब यांना तपास अधिकारी म्हणून काही तासात वर्ग केला.पत्रकार दीपक खैरनार यांचेवर नामपुर येथे शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे.

या संपुर्ण घटनाक्रमात परिषद उपाध्यक्ष यशवंत पवार, प्रभारी जिल्हाध्यक्ष कल्याणराव आवटे, कायदेविषयक सल्लागार अॅड.शेखर देसाई,काशिनाथ हांडे,रमेश देसले,निलेश गौतम यांनी रात्रीचा दिवस करत पत्रकार दीपक खैरनार यांना न्याय मिळवून दिला. यात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button